loader
Breaking News
Breaking News
Foto

सुकोंडी बोरथळ शाळेतील प्राप्तीने प्राप्त केले नवोदय परीक्षेत उज्वल यश ---

दापोली(प्रतिनिधी)- तालुक्यातील जि. प. शाळा सुकोंडी बोरथळ शाळेत शिकत असलेली प्राप्ती प्रमोद जाधव हिने जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेत उज्वल यश प्राप्त केले. तिच्या यशाबद्दल आंजर्ले प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी तथा माजी गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी शिक्षक संघटनांचे पदाधिकारी जीवन सुर्वे, दिलीप मोहिते, पालक प्रमोद जाधव, आदिंच्या उपस्थितीत तिचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. विशेष बाब म्हणजे प्राप्ती ज्या बोरथळ शाळेत शिक्षणाचे धडे गिरवते ती शाळा एकशिक्षकी असून रुपाली प्रमोद जाधव या प्राप्तीच्या आईच तिथे मार्गदर्शक शिक्षिका आहेत. आज काल इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा कल असतांनाही रुपाली जाधव यांनी प्राप्तीला आपल्याच शाळेत ठेऊन आत्मविश्वास सिध्द केला. प्राप्तीचे वडील प्रमोद जाधव हे जिल्हा परिषद इळणे शाळेत पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांचे देखील प्राप्तीला बहुमोल मार्गदर्शन लाभले. याबद्दल प्राप्ती आणि तिचे पालक यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg