केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) : रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आयोजित महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे ६३ वे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन दिनांक १२ व १३ एप्रिल रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील सर विश्वेश्वरय्या सभागृहात येथे संपन्न होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन १२ रोजी दुपारी १२ वाजता उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत व शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते पार पडणार आहे. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम असून राज्य महामंडळ उपाध्यक्ष सुनील पंडित (अहिल्यानगर) हे अधिवेशनाचे अध्यक्ष असणार आहेत.
उद्घाटन समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, रोजगार हमी योजना मंत्री भरत शेठ गोगावले, महिला व बालविकास मंत्री श्रीमती आदिती तटकरे, मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे, शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर, कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, कोकण विभाग पदवीधर आमदार निरंजन डावखरे, पुणे विभाग शिक्षक आमदार जयंत आसगांवकर, नाशिक विभाग शिक्षक आमदार किशोर दराडे, आमदार भास्करराव जाधव, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष सुभाष माने, अरुण थोरात, कोकण विभागीय मंडळ अध्यक्ष राजेश क्षीरसागर, कोल्हापूर विभाग शिक्षण उपसंचालक महेश चोथे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सौ.सुवर्णा सावंत, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.एम.कासार यांची उपस्थिती राहणार आहे. या अधिवेशनात १२ रोजी दुपारी ३ वाजता ’महाराष्ट्रातील सीबीएसई पॅटर्न : केंद्रीय व राज्य शिक्षण मंडळ तुलनात्मक अभ्यास’ या शोध निबंधाचे सादरीकरण कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थान माजी अध्यक्ष जे. के. पाटील भूषवणार आहेत. दुपारी ४.३० वाजता मुख्याध्यापक महामंडळ पदाधिकारी सत्कार माजी मंत्री व आमदार रवींद्र चव्हाण व कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहेत. दि. १३ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता ’राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व मुख्याध्यापक भूमिका’ या विषयावर डॉ. बी.एम. हिर्डेकर यांचे व्याख्यान होणार आहे तर १०.३० वाजता माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे यांच्याहस्ते गुणवंत मुख्याध्यापक राज्य पुरस्काराचे वितरण होणार आहे. यावेळी शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह, कुलगुरू डॉ. संजय भावे, शिक्षण संचालक प्राथमिक तथा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, पुणे शिक्षण उपसंचालक हारून अतार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
तरी सर्व मुख्याध्यापकांनी मोठ्या संख्येने अधिवेशनास उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, कार्याध्यक्ष आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, सचिव नंदकुमार सागर यांच्यासह अधिवेशन संयोजक रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष अय्युब मुल्ला, उपाध्यक्ष संजय चव्हाण, सचिव महेश पाटकर, राज्य महामंडळ सहसंपादक रमेश तरवडेकर, कोषाध्यक्ष संदेश राऊत यांच्यासह सर्व जिल्हा व तालुका कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य यांनी केले आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.