loader
Breaking News
Breaking News
Foto

उमरे गावात नोंदणीकृत बांधकाम व इतर कामगार यांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

संगमेश्वर (सत्यवान विचारे) : उमरे गावात नोंदणीकृत बांधकाम कामगार आणि इतर मजुरांची मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले. दिनांक १३ एप्रिल २०२५ रोजी उमरे (संगमेश्वर) येथे कामगार मंडळ मुंबई यांच्या मार्फत नोंदणीकृत बांधकाम व इतर कामगार यांच्यासाठी मोफत आरोग्य शिबिर राबवले गेले. या शिबिरामार्फत ५० पेक्षा अधिक चाचण्या केल्या जातात ज्यामध्ये रुग्ण कामगारास ५००० प्रतिवर्षी औषधांसाठी खर्च दिला जातो, तसेच आजार मोठा असेल तर अपेक्स हॉस्पिटल व लोटलीकर हॉस्पिटल रत्नागिरी येथे दोन लाख पर्यंतचा उपचार मोफत केला जातो.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या शिबिरासाठी मंडळातर्फे श्रीमती कोमल पाटील, शुभम सुर्वे व स्वयम् सुर्वे हे उपस्थित होते. बांधकाम व इतर कामगार मंडळ मुंबई यांच्यामार्फत नोंदणीकृत कामगारांसाठी राबविण्यात येणार्‍या अनेक योजनांची माहिती देण्यासाठी या मंडळाचे संगमेश्वर तालुका व्यवस्थापक शैलेश पवार हे उपस्थित होते. त्यांनी अनेक कामगारांच्या शंका दूर केल्या. या शिबिरासाठी सरपंच सायली मोहिते उपसरपंच प्रभाकर जाधव, उमरे ग्रामविकास मंडळ अध्यक्ष महेंद्र जाधव, सूर्यकांत बसवणकर, माजी सरपंच बेंडु बसवणकर, आशा सेविका सौ सोनाली बाईत, महादेव बसवणकर, रोशन साळवी, राजाराम बाईत, कमलेश बाईत, तसेच ग्रामस्थ उपस्थित राहून शिबिराला प्रोत्साहन दिले तसेच या मान्यवरांनी ठेकेदार कु. प्रिया महेंद्र जाधव हिचे तिने व्यवसायातून वेळ काढून आपल्या कामगारांसाठी नोंदणी करून त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत तिचे कौतुक केले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg