loader
Breaking News
Breaking News
Foto

देवगड तालुक्यात जि. प.पडेल बापर्डे, गटातून,प. स. पडेल, नाडण,बापर्डे गणातून भाजपचे ५ उमेदवार बिनविरोध! महाविकास आघाडीला दणका!

देवगड (दयानंद मांगले )जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत देवगड तालुक्यातील भाजपचे २ जिल्हा परिषद गटातील सदस्य व पंचायत समिती तीन गणातील ३ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत त्यामुळे देवगड तालुक्यात एकूण ५ सदस्य बिनविरोध निवडून आले. भाजप धडाडीचे नेते पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी देवगड तालुका भाजपचाच बालेकिल्ला असून पुन्हा एकदा आपला करिष्मा दाखवून दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला विरोधकांना जोरदार दणका बसला आहे. या बिनविरोध विजया मुळे भाजपने देवगड तालुक्यात आपले विजयी खाते खोलले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत जिल्हा परिषद गट पडेल आणि बापर्डे जिल्हा परिषद गट येथून नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांनी आपली उमेदवारी शनिवारी मागे घेतल्याने पडेल जिल्हा परिषद गटातून सुयोगी रवींद्र घाडी या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार बिनविरोध तसेच बापर्डे जिल्हा परिषद गटातून भाजप महायुतीच्या अवनी अमोल तेली या बिनविरोध निवडून आल्या आहेत.तसेच पडेल पंचायत समिती गणातून भाजपा चे अंकुश यशवंत ठुकरूल हे बिनविरोध तर नाडण पंचायत समिती मधून भाजपा चे गणेश सदाशिव राणे हे बिनविरोध विजयी झाले आहेत. देवगड तालुक्यात जिल्हा परिषद गट पडेल आणि जिल्हा परिषद गट बापर्डे या दोन गटातील विरोधी उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्याने या ठिकाणचे भाजपचे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.तसेच पडेल पंचायत पंचायत समिती गण आणि नाडण पंचायत समिती गणातील विरोधी उमेदवारांनी देखील उमेदवारी मागे घेतल्याने या गणातील भाजपचे २ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने तालुक्यातील ५ जिल्हा परिषद जागांकरिता २३ उमेदवार रिंगणात असून पंचायत समितीच्या अकरा जागांकरिता ३१ उमेदवार रिंगणात आहेत. पडेल जिल्हा परिषद गटातून अंकिता सुहास वाडेकर (अपक्ष) स्नेहल सत्यवान मेस्त्री (उबाठा) यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या पडेल जि प गटातून भाजपच्या सुयोगी रवींद्र घाडी या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

टाइम्स स्पेशल

तसेच बापर्डे जिल्हा परिषद गटातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या रेश्मा रविंद्र सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या जि प गटातील भाजपच्या उमेदवार अवनी अमोल तेली या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्याचबरोबर पडेल पंचायत समिती गणातून शशांक शरद तावडे (उबाठा) सुहास वसंत वाडेकर (अपक्ष) यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने पडेल पंचायत समिती गणातून अंकुश यशवंत ठुकरूल हे भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्याचबरोबर नाडण पंचायत समिती गणातून उबाठाचे सुहास वसंत वाडेकर (उबाठा )मकरंद यशवंत जोशी (अपक्ष )यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचे गणेश सदाशिव राणे हे बिनविरोध निवडून आले आहेत. बापर्डे पंचायत समिती गण मधून सुलोचना सीताराम धुरी (उबाठा)यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजप महायुतीच्या संजना संजय लाड या बिनविरोध निवडून आल्या आहेत.त्यामुळे देवगड तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे दोन जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे तीन पंचायत समितीचे तीन सदस्य हे बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच कोटकामते पंचायत समिती गणातून उबाठाच्या प्रगती प्रदीप तेली यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg