loader
Breaking News
Breaking News
Foto

बुरोंडीच्या 'परशुराम भूमी'तील महाकाय मूर्ती आता नव्या रूपात सज्ज; पर्यटकांची पावले वळू लागली

दापोली (​सागर गोवळे) - कोकणातील निसर्गरम्य दापोली तालुक्यातील बुरोंडी येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या 'परशुराम भूमी' मधील भगवान परशुराम यांच्या भव्य मूर्तीचे रंगकाम अखेर पूर्ण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून या मूर्तीच्या नूतनीकरणाचे आणि रंगरंगोटीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू होते, जे आता यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याने मूर्तीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डोंगरमाथ्यावर वसलेल्या पृथ्वीच्या गोलार्धावर उभ्या असलेल्या या ४० फूट उंच भगवान परशुराम यांच्या मूर्तीला दिलेला नवीन तजेलदार रंग आणि करण्यात आलेली सजावट यामुळे या परिसराचा कायापालट झाला आहे. अरबी समुद्राच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण धारण केलेली ही तेजस्वी मूर्ती आता अधिक प्रभावी आणि विलोभनीय दिसत आहे. मूर्तीचे काम पूर्ण झाल्याची माहिती मिळताच पर्यटकांनी बुरोंडीकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः शनिवार आणि रविवारी सुट्टीच्या निमित्ताने पर्यटकांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg