ठाणे (प्रतिनिधी )ठाण्यात दिवा येथील शिळफाटा परिसरात कशफ नबीला खान (०६) या मुलीचा शुक्रवारी सायंकाळी मित्र मैत्रिणींसह खेळत असताना डबक्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी उघडकीस आली आहे.
शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास कशफ हि आपल्या मित्र मैत्रिणींसह घराशेजारील परिसरात खेळत असताना परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी ती पोहचली. यावेळी ती पाण्याच्या डबक्यात तोल जाऊन पडली. कशफ ही शिळफाटा येथील आशना हाईट्स येेथे राहत होती. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती कुठेही सापडली नसल्याने घरच्या लोकांनी डायघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी शिळ अग्निशमन केंद्राचे स्थानक अधिकारी, डायघर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. त्यांनी तिचा शोध सुरू केला तेव्हा पाण्याच्या डबक्यात तिचा मृतदेह आढळून आला. डायघर पोलिसांच्या उपस्थितीमध्ये तिचा मृतदेह पुढील कार्यवाहीकरिता कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.या दुर्घटनेमुळे प्रकरणी डायघर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.




















2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)














































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.