मालवण (प्रतिनिधी) - मालवण कुंभारमाठ येथील सागरी महामार्ग परिसरात राहणाऱ्या मुस्ताक शरफुद्दीन अथनीकर यांच्या घराच्या खिडकीची काच फोडून अज्ञात चोरट्याने घरफोडी करत ४५ हजार रुपये किंमतीचा सोन्याचा हार चोरून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी मालवण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मालवण पोलिसांत मुस्ताक शरफुद्दीन अथनीकर (५०, रा. कुंभारमाठ सागरी महामार्ग, मालवण) यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार मुस्ताक अथनीकर हे दि. ९ फेब्रुवारी रोजी आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या जत्रेसाठी कुटुंबासह रात्री ११ वा. सुमारास घराला कुलूप लावून गेले होते. १० फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वा. ते घरी परतल्यानंतर घराच्या हाँलमधील स्लायडिंग खिडकीची काच फोडलेली असल्याचे निदर्शनास आले.
घरात प्रवेश केल्यानंतर किचनमधील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. बेडरूममधील पत्र्याच्या कपाटाचा लॉकर उचकटून फोडण्यात आले होते. तपासणी केली असता, कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेला १२ ग्रॅम वजनाचा अंदाजे ४५ हजार रु. किमतीचा सोन्याचा हार चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संदीप खाडे करीत आहेत.











































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)










































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.