रत्नागिरी : ग्रामविकासाच्या ध्येयाने झपाटलेल्या नेतृत्वाचा आज राज्यस्तरावर गौरव झाला असून, पुणे येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात रत्नागिरी जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा अभिमानाने झळकले आहे. रत्नागिरी तालुक्यातील टिके ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. भिकाजी यशवंत शिनगारे यांना 'नालंदा ऑर्गनायझेशन' तर्फे आयोजित 'महाराष्ट्र राज्य ग्राम समृद्धी सन्मान सोहळा २०२६' मध्ये 'आदर्श सरपंच' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रत्नागिरी तालुक्यातील एकूण ९४ ग्रामपंचायतींमधून शिनगारे यांची या विशेष पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. गावचा सर्वांगीण विकास, प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकता आणि राबवलेल्या नाविन्यपूर्ण योजनांची दखल घेऊन त्यांना या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात आले. पुण्यातील या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिनगारे यांच्या या यशामुळे संपूर्ण रत्नागिरी तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आदर्श गाव घडवण्याचे त्यांचे स्वप्न आणि त्यांनी केलेली विकासकामे आता राज्यस्तरावर इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायी ठरणार आहेत. या पुरस्कारामुळे टिके गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.





.jpg)



























































































2.jpg)





1.jpg)












































































































.jpg)





































































































































































































































































































.jpg)
































































.jpg)




































































































































































































.jpg)






































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.