loader
Breaking News
Breaking News
Foto

पाेलिस निरीक्षक विवेक पाटील यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर

रत्नागिरी : रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक (तपास) जाहीर झाले आहे. सन २०१८ मध्ये सांगली जिल्ह्यातील कुरळप येथे सहायक पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना केलेल्या तपासकामी हे पदक जाहीर झाले आहे. त्यांना एका आश्रम शाळेमध्ये मुलींवर अत्याचार होत असल्याचा एक निनावी अर्ज आला होता. या अर्जाची दखल घेत त्यांनी या ठिकाणी एका महिला पोलिस उपनिरीक्षक यांना त्या ठिकाणी पाठवून गोपनिय स्टिंग ऑपरेशनद्वारे छडा लावला हाेता. त्यानंतर संस्थापक व त्यांची मदतनीस महिला या दोघांवर बालकांचे लैगिंक अत्याचार असा गुन्हा दाखल करून या दोघांना अटक केली होती. या दोघांनाही या प्रकरणात चार वेळा जन्मठेप झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg