loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात श्री विठ्ठलाच्या भव्य मूर्तीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अनावरण

ठाणे (प्रतिनिधी) : गोमातेला राज्य मातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य आहे. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. सावळ्या विठ्ठलाच्या या भव्य मूर्तीमुळे हा परिसर आणखी पवित्र झाला असून ठाण्याला प्रति पंढरीचे रूप प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाण्यात उपवन तलाव परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट तयार झाला. तिथे आता ही सगळ्यात मोठी विठ्ठल मूर्ती साकारली आहे. साक्षात पांडुरंग इथे आलेला आहे, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट, उपवन येथील श्री विठ्ठलाच्या भव्य मूर्तीेच्या अनावरण सोहळ्यात बोलत होते. उद्घाटन कार्यक्रमात बोलताना शिंदे म्हणाले, आजचा दिवस ठाणेकरांसाठी पवित्र आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात आपण भगवान पांडुरंगाची सेवा करतो, पण आज तुमच्या सर्वांच्या रूपाने पांडुरंग येथे उपस्थित आहे. यावेळी भक्तांची मांदियाळी उसळली होती. मंत्री प्रताप सरनाईक, अन्य मान्यवर व जनतेच्या साक्षीने हा ऐतिहासिक आणि भक्तिमय सोहळा पार पडला. यानिमित्ताने कार्तिकी एकादशीच्या महापूजेला जाण्यापूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले असल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ते पुढे म्हणाले, पांडुरंगाची ५१ फूट उंच अशा भव्य मूर्तीची स्थापना ठाण्यात झाली आहे. हे कार्य प्रताप सरनाईक आणि त्यांच्या टीममुळे शक्य झाले. ठाणेकर भाग्यवान आहेत. शिंदे यांनी आपल्या कार्यकाळाची आठवण करून देत सांगितले, मी मुख्यमंत्री असताना अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या. शंकराचार्यांनी मला ’काऊ मॅन’ ही पदवी दिली आणि ते माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ते भावनिक होत म्हणाले, मी वारकरी आणि शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. लहानपणी आजी-आजोबा, आई-वडिलांसोबत पंढरपूरला जात होतो. आज उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर विठ्ठल भक्त म्हणून येथे आलो आहे. शिंदे म्हणाले, वारकरी दिंड्यांना अनुदान, विमा आणि वाहन टोलमुक्ती हे महायुती सरकारनेच केले. पंढरपूरमध्ये स्वच्छता, पाणी, मोबाईल सुविधा, शौचालये उपलब्ध केली आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाल्याने सरकार मदत करेलच. पण ज्यांच्या घरी लग्न ठरले आहे ते लग्न मोडणार नाही; सर्व खर्च शिवसेना करेल, असे शिंदे म्हणाले. शेतकर्‍यांची कर्जमुक्ती करण्याचा निर्णय देखील महायुती सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

प्रताप सरनाईक यांनी पूरग्रस्त भागात १०१ गायी दान केल्याचे सांगत त्यांच्या कार्याचे कौतुकही त्यांनी केले. इंदुरीकर महाराज साध्या, सोप्या भाषेत समाजाला दिशा देतात. हरिनाम सप्ताहात सहभागी झाल्याने वाईट विचार जातात, अशी शिकवण आम्हाला आनंद दिघे यांनी दिली, असे शिंदे म्हणाले. ठाणे बदलत आहे. हा घाट अहिल्यादेवींच्या नावाने उभारला आहे. मिरा-भाईंदर येथे २ आणि कासार वडवली येथे १ अशा चार ठिकाणी अशा विठ्ठल मूर्ती उभारल्या जातील, असे ते म्हणाले. शेवटी ते म्हणाले, मी चीफ मिनिस्टर नाही, कॉमन मॅन आहे. तुमच्या आशीर्वादाने शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री हा प्रवास शक्य झाला. वारकरी संप्रदाय जिथे बोलावतो तिथे धावून येतो. असे आवर्जून सांगितले. या सोहळ्यास, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर एच. एस. पाटील, निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर), माजी नगरसेवक परिषा सरनाईक, विहंग सरनाईक, पूर्वेश सरनाईक, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपनगर अभियंता सुधीर गायकवाड, कार्यकारी अभियंता संजय कदम आदी उपस्थित होते. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. ही शिवरायांची, वीरांची आणि संतांची भूमी आहे. वारकरी संप्रदाय फार मोठी एक शक्ती या महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणून मुख्यमंत्री असताना वारकरी दिंड्यांना अनुदान सुरू केले. असे अनुदान देणारे पहिला आपले पाहिले सरकार. वारकर्‍यांचा विमा काढण्याचा निर्णय घेतला. दिंड्या टोल फ्री केल्या, असेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg