loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणच्या महामार्गाचे काम 'फास्ट ट्रॅकवर' तटकरे-गडकरी भेटीतून सुटणार माणगावातील वाहतूक कोंडीचा प्रश्न

संगलट खेड (इक्बाल जमादार) - कोकणातील जनतेच्या वर्षानुवर्षे चाललेल्या "रखडलेल्या रस्त्यांच्या त्रासाला" आता अंतिम उपाय शोधण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी नवी दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबत महत्त्वाची बैठक घेतली. या भेटीत मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग एनएच-६६ वरील अपूर्ण कामांना तात्काळ गती देणे, इंदापूर आणि माणगाव बायपासला हिरवा झेंडा दाखवणे. तसेच रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल बांधण्याची जोरदार मागणी करण्यात आली. गेल्या १५ वर्षांपासून बायपासच्या रेंगाळलेल्या कामामुळे इंदापूर, माणगाव शहरात तसेच महामार्गवर होणारी वाहतूक कॉडी, खड्डे आणि अपघातांच्या भीतीतून जाणाऱ्या कोकणाला आता एक सुरळीत आणि सुरक्षित प्रवास मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. १७वर्षांचा त्रास, अखेरीस अंतिम टप्प्यात आला आहे. भूसंपादन, कंत्राटदारांची टाळाटाळ आणि निधी वाटपाच्या गुंतागुंतीमुळे या रस्त्याचे काम वारंवार विलंबले आहे. या कामावर आत्तापर्यंत दुप्पटहून अधिक रक्कम खर्च होऊन देखील प्रवास अजूनही धोकादायक आहे. त्यामुळे प्रवासी नागरिकांचे खड्डे आणि कोंडीतून जनजीवन बेचिराख होत आहे. माणगाव इंदापूर शहरामध्ये सतत वाहतूक कोंडी होत असते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महामार्ग व शहरांतून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांच्या लोंढ्यामुळे श्वासोच्छ्वासाच्या रुग्णांनाही या वाढत्या प्रदूषणाचे धक्के बसत आहेत. या वाहतूक कोंडीचा फटका पर्यटक प्रवासी नागरिकांना तर बसतोच शिवाय शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थीयांनाही त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सव, दिवाळी, होळी उत्सव, लग्नसराई, पर्यटन हंगाम आणि शाळा, महाविद्यालयांच्या सुट्टीत रस्त्यावर तासन्‌तास गर्दी राहते. अपघातांचा धोका वाढतो, तर मानवी जीव धोक्यात येतात. यामुळे रस्ता फक्त "वाहतूक मार्ग" राहिला नाही, इंदापूर, माणगाव बायपास शहरांतील अपूर्ण बायपासचे काम तात्काळ पूर्ण करून कोकणातील नागरिक प्रवाशांना दिलासा मिळावा या पार्श्वभूमीत खा. सुनील तटकरे यांनी इंदापूर आणि माणगाव बायपास प्रकल्पांना तात्काळ मंजुरी आणि वाहतूक मुक्ती देण्याची विशेष मागणी केली. या बायपास मुळे शहरातून जाणारा ट्रक-लोंढा बाहेरून वळवला जाईल. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी ६० ते ७० टक्क्यापर्यंत घटण्याची शक्यता आहे.

टाईम्स स्पेशल

त्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाचे ४८५ किमीं पैकी ४६५ किमी अंतरातील चार पदरी काम आता तयार झाले आहे. उर्वरित अंदाजे २० किमी अंतरावरील काम सुरू असून, अधिकाऱ्यांनी जून २०२६ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यातून मुंबई ते गोवा प्रवास आता ६७ तासांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तरीही, गेल्या वर्षांत अनेक वेळा घोषित झालेल्या "डेडलाईन" उडाल्यामुळे नागरिकांच्या मनात शंका आणि आशा यांचा मिलाप आहे. रेल्वे क्रॉसिंग आणि उड्डाणपूल लवकरात लवकर पूर्ण करून वाहतूक सुरळीत करण्याचा मार्ग मोकळा केल्यास प्रवासी नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. अशी आशा भेटी दरम्यान व्यक्त करण्यात आली. तसेच खा. तटकरे यांनी रेल्वे प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात तात्काळ समन्वय व्हावा, अशीही मागणी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या मागण्यांची गंभीर दखल घेतली असून. राष्ट्रीय महामार्ग-६६ चे उर्वरित काम जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी यापूर्वीच लोकसभेतही दिली होती. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देण्याचे आश्वासन दिले आणि मुंबई-गोवा प्रकल्पाला केंद्र सरकार पूर्ण ताकतीने काम करत आहे, असे स्पष्ट केले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg