loader
Breaking News
Breaking News
Foto

गावतळेत 25 एप्रिल रोजी हिंदू संमेलनाचे आयोजन

दापोली (प्रतिनिधी) - हिंदू सारा एक मंत्र हा, दाही दिशांना घुमवूया! ” या घोषवाक्याने गावतळे परिसरात हिंदू ऐक्याची भव्य उर्जा उसळणार असून, सकल हिंदू समाज आयोजित ‘ हिंदू संमेलन’ शनिवारी, दि. 25 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वा. श्रीमान मथुरभाई बुटाला हायस्कूल मैदान गावतळे येथे पार पडणार आहे. या हिंदू संमेलनाला गावतळे, रुखी, शिवनारी, असोंड, शिवाजीनगर, साखळोली, सडवे, कोळबांदे, शिरवणे, उर्फी बोरिचा कोंड, पन्हाळेकाझी, दाभीळ, पांगारी आदी 13 गावांतील हिंदू बांधव उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे हे हिंदू संमेलन हिंदू समाजाच्या एकजुटीचे आणि सामर्थ्याचे प्रभावी संदेश देणारे ठरणार आहे. सध्याच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत धर्म, देश आणि संस्कृती रक्षणासाठी हिंदू समाजाने संघटित होणे ही काळाची गरज असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. समाजावर होणाऱ्या विविध आव्हानांना समर्थपणे उत्तर देण्यासाठी एकत्र येणे, आत्मविश्वास जागवणे आणि हिंदू संस्कृतीचे रक्षण करण्याचा संकल्प या संमेलनातून दृढ केला जाणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या भव्य संमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून चिपळूण येथील ह.भ.प. रोहित महाराज आग्रे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून हिंदू धर्म, अध्यात्म आणि संघटनशक्तीबाबत प्रेरणादायी विचार मांडले जाणार आहेत. तसेच, कोकण प्रांतातील गोसेवा गतिविधी टोळी सदस्य व गो ग्राम आयाम प्रमुख, लँड डेव्हलपर्स तसेच हिंदू संघटन कार्यात सक्रिय असलेले सचिन प्रमोद शेठ हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहून हिंदू संघटन आणि सामाजिक कार्याविषयी आपले विचार मांडणार आहेत. महिला सशक्तीकरणाचा संदेश देण्यासाठी प्रोम ग्रुप ऑफ कंपनी, गावतळेच्या संचालिका सायली संदीप जोशी या महिला प्रवक्त्या विशेष मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर मर्दानी खेळ, विविध प्रात्यक्षिके, लेझीम, दिंडी असे विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

टाईम्स स्पेशल

हे संमेलन अतिशय भव्यदिव्य व्हावे यासाठी संयोजन समिती मेहनत करत असून प्रत्येक गावातील प्रत्येक हिंदू कुटुंबाशी संपर्क करत आहे. संमेलनाच्या माध्यमातून “एकत्र येऊया… एकत्र राहूया… बलशाली हिंदुस्थान घडवूया!” हा निर्धार अधिक दृढ करण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर गावतळे परिसरातील सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक एकजुटीच्या सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg