दापोली (शशिकांत राऊत) - सुमारे 350 वर्षाची फार जुनी परंपरा असलेल्या रुखी येथील श्री काळकाई व श्री पद्मावती देवी ग्रामदेवतेच्या प्राचीन मंदिरात अभिषेक, होमहवन, श्री सत्यनारायणाची महापूजा, महाआरती, प्रमुख अतिथींचे स्वागत सोहळा आदी धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांने मंदिर जिर्णोद्धाराचा १० वा वर्धापनदिन कार्यक्रम सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडला. दिवसभर चाललेल्या विविध कार्यक्रमांमुळे संपूर्ण गाव भक्ती आणि आनंदाच्या वातावरणात न्हाऊन निघाले होते. या वर्धापनदिन कार्यक्रम निमित्त आयोजिलेल्या महाप्रसादाचा लाभ मोठ्या संख्येने भाविकांनी घेतला.
विशेष करून महिलांसाठी खास आयोजित केलेला हळदी-कुंकू समारंभ, पैठणीचा खेळ आणि ‘होम मिनिस्टर’ हे कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. तर स्थानिक ग्रामस्थांच्या भजन कार्यक्रमाने वातावरण अधिक भक्तिमय झाले. ह.भ.प. चंद्रकांत पवार महाराज यांच्या हरिपाठ आणि आरतीच्या कार्यक्रमाने शोभा वाढली. त्यातच मान्यवरांचा सत्कार व विद्यार्थी गुणगौरव सोहळयाने सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे महत्वाचे काम रुखी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. ‘सांभाळ तुझं सौभाग्य’ हे तीन अंकी हृदयस्पर्शी नाटक सादर करण्यात आले ज्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वर्धापन दिनानिमित्त रुखी गावातील श्रद्धा, संस्कृती आणि एकोप्याचे सुंदर दर्शन घडले.























































































2.jpg)





























.jpg)






























































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.