रत्नागिरी : शहरातील श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेच्यावतीने जेष्ठ अधिकमासाचे औचित्य साधून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे जंगी आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १७ मे पासून या अभूतपूर्व सोहळ्याला भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली असून, पुढील महिनाभर रत्नागिरीकरांना भक्तीरसात न्हाऊन निघण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. उत्सवाचा प्रारंभ रविवारी सकाळी ७ वाजता षोडशोपचार पूजा, अभिषेक आणि आरतीने झाली. तर दुपारी नैवेद्य दाखवला जाईल. पहिल्याच दिवशी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत उदय मेस्त्री आणि सहकारी (श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ, केळये बुवा) यांच्या सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम रंगणार आहे. यानंतर सोमवार, १८ मे पासून ते रविवार, २४ मे पर्यंत दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत भव्य ‘कीर्तन सप्ताह’ आयोजित करण्यात आला असून, यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची लोभसवाणी आणि सुश्राव्य कीर्तने ऐकायला मिळतील.
या महिनाभराच्या उत्सवात अनेक विशेष आकर्षणे असतील. बुधवार, २० मे रोजी भगवान श्री राधाकृष्णाच्या गाभाऱ्यात हापूस आंब्यांची आकर्षक आरास केली जाईल. तर २५ मे रोजी नाचणे येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे संक्षिप्त भागवत पारायण होईल. त्यानंतरच्या दिवसांत भवानी महिला भजन मंडळ (टिळक आळी) आणि बावनदी महिला मंडळाची सुश्राव्य भजने, श्री शंकर महाराज मठाची प्रार्थना आणि शुक्रवार व शनिवारी (२९ आणि ३० मे) इस्कॉन समूहाचा ‘हरे राम हरे कृष्ण’ सत्संग रंगणार आहे. रविवार, ३१ मे रोजी सकाळी १० वाजता अधिकमासाचे विशेष महत्त्व असणारी '३३' जोडप्यांची भव्य श्री सत्यनारायण महापूजा संपन्न होईल आणि दुपारी १ वाजता आरती व महाप्रसाद वाटप केले जाईल. यानंतर मंगळवार, २ जून ते सोमवार, ८ जून या कालावधीत सौ. अंजली दीपक बर्वे यांच्या सुश्राव्य वाणीतून 'भागवत सप्ताह' रंगणार आहे. मंगळवार, ९ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून भव्य 'श्री विष्णू याग' होईल, ज्याची सांगता दुपारी आरती आणि महाप्रसादाने होईल. उत्सवाचा समारोप रविवार, १४ जून रोजी दुपारी १२ वाजता श्री राधाकृष्णाला ५६ भोग अर्पण करून आणि त्यानंतर महाप्रसादाने केला जाईल.
या संपूर्ण महिनाभरात दररोज सकाळी ७ वाजता षोडशोपचार पूजा व अभिषेक आणि सायंकाळी ७ वाजता आरती होणार आहे. दररोजच्या अभिषेकासाठी श्री सुशील (बाबा) मलुष्टे (9561056444) यांच्याकडे, तर ३३ सत्यनारायण पूजेसाठी २५ मे पूर्वी श्री संतोष रेडीज (8459854428) यांच्याकडे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहिती आणि वर्गणीसाठी श्री अजय गांधी (7741921313) व श्री निलेश मलुष्टे (9975553533) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन अधिकमास उत्सव प्रमुख श्री सुदेश रेडीज आणि श्री राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेचे अध्यक्ष श्री राजन शामकांत मलुष्टे यांनी केले आहे. सर्व भाविकांनी या महिनाभराच्या भक्ती सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे निमंत्रण संस्थेच्या वतीने देण्यात आले आहे.




































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.