loader
Breaking News
Breaking News
Foto

दाभोळ येथील श्री इंगळाई देवी रस्त्याची दुर्दशा

दापोली (प्रतिनिधी) - ऐतिहासिक बंदर असलेल्या दाभोळ गावातील समुद्रकिनाऱ्याच्या काठावर श्री इंगळाई देवी जागृत देवस्थान मंदिर आहे. अशा या दाभोळवासीयांचे श्रद्धेचे ठिकाण असलेल्या श्री इंगळाई देवी मंदिराकडे जाणारा रस्ता मागील पावसाळ्यात एका ठिकाणी उखडला होता तसेच समुद्रालगतची बाजू एका ठिकाणी खचली होती या घटनेला वर्ष होत आले तरी रस्ता सुधारण्याचे काही नाव नाही. त्यामुळे नेहमी येथे दर्शनासाठी येणारे भक्तगण भाविक नाराजी व्यक्त करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दाभोळ गावापासून अवघ्या दहा ते पंधरा मिनिटे अंतरावर हे मंदिर आहे. श्री इंगळाई देवीचा गोंधळ दर तीन वर्षांनी मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्याची येथील फारच जूनी परंपरा आहे. स्थानिक परंपरेनुसार इंगळाई देवी ही श्री चंडिका देवीची बहिण मानली जाते देवीचा भाऊ म्हणून भैरीबुवाचे मंदिर देखील याच ठिकाणी आहे. इंगळाई देवीच्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे समुद्र काठावर वसलेल्या या मंदिराला दरवाजा नाही. इंगळाई मंदिर देवस्थान येथून समुद्राचा नजारा डोळ्यात साठवण्यासारखा आहे. मंदिराच्या ठिकाणाहून अथांग समुद्राचे घडणारे दर्शन, सायंकाळी येथून दिसणारे सुर्यास्ताचे प्रतिबिंब हे निसर्गाच्या ऱगबेरंगी छटांच्या मुक्त उधळणीचे सृष्टीसौंदर्य पाहताच मन जसे प्रसन्न होते तसे मंदिरातील इंगळाई देवीच्या दर्शनाने मनाचे समाधान होते. असे हे ठिकाण भक्तगण भाविकांचे श्रद्धास्थान आहे तसेच ते पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांचाही येण्यासाठीचा ओघ देखील वाढताच आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या रस्त्याची सुधारणा आवश्यक आहे मात्र अद्यापही ती करण्यात आलेली नाही. रस्ता ग्राम पंचायतीच्या मालकीचा की जिल्हा परिषदेच्या मालकीचा, यापेक्षा त्या रस्त्याचे वाहतुकिच्या दृष्टीने महत्त्व पाहता पावसाळ्यापूर्वी रस्ता सुधारणा करण्यासाठी संबंधितांनी पावले उचलणे गरजेचे आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg