loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा शहरासह ग्रामीण भागातील विकासकामांना मोठी गती

रत्नागिरी : लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघातील विकासाचा अनेक वर्षांचा रखडलेला बॅकलॉग भरून काढण्याचा निर्धार आमदार किरण सामंत यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पातून कल्पक नियोजन आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या जोरावर त्यांनी तब्बल ६६ कोटी ९२ लाख रुपयांहून अधिक निधी मंजूर करून घेतला असून, लांजा शहरासह ग्रामीण भागातील विकासकामांना मोठी गती मिळणार आहे. विशेष म्हणजे, लांजा शहराला आधुनिक आणि ‘हायटेक सिटी’चे स्वरूप देण्याच्या दृष्टीने प्रमुख शासकीय इमारतींच्या नव्या उभारणीसह रस्ते, पूल, साकव आणि दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. या निधीतून ग्रामीण रुग्णालयाची मुख्य इमारत, नवीन शासकीय विश्रामगृह, पाच मंडळ अधिकारी कार्यालये, १३ तलाठी कार्यालये तसेच १०८० मेट्रिक टन क्षमतेचे शासकीय गोदाम उभारले जाणार आहे. या इमारतींसाठीच सुमारे २५ कोटी ३० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, तहसीलदार निवासस्थान आणि विविध शासकीय कार्यालयांच्या दुरुस्तीची कामेही हाती घेण्यात येणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लांजा तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या मजबुतीकरण आणि डांबरीकरणासाठी तब्बल १८ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. दाभोळ-आसगो-लांजा-राजापूर मार्ग, लांजा-माजळ-जावडे-इसवली-पनोरे मार्ग, निवसर रेल्वे स्टेशन रस्ता, तळवडे फाटा-आडवली मार्ग आदी महत्त्वाच्या रस्त्यांचा यात समावेश आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक अधिक सुलभ होणार असून शेती, व्यापार आणि पर्यटनालाही चालना मिळणार आहे. तालुक्यातील मोठ्या व लहान पुलांच्या उभारणीसाठी सुमारे २० कोटी ५२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिपोशी, कोर्ले, वेकेवली, दाभोळे परिसरातील पुलांमुळे अनेक गावांचा संपर्क अधिक सुरक्षित आणि गतिमान होणार आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत स्मशानभूमी रस्त्यांवर काँक्रीट बांधकामासाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

विशेष म्हणजे, शासकीय इमारतींच्या दुरुस्तीसाठी स्वतंत्रपणे २ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात पोलीस कर्मचारी निवासस्थाने, ग्रामीण रुग्णालय, तहसील कार्यालय, भूमी अभिलेख कार्यालय तसेच अन्य प्रशासकीय इमारतींच्या दुरुस्तीचा समावेश आहे. आमदार किरण सामंत यांच्या पुढाकारामुळे लांजा शहराचा चेहरामोहरा बदलण्यास सुरुवात झाली असून, शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांच्या मूलभूत समस्यांना लवकरच दिलासा मिळणार असल्याची भावना जनतेत व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg