loader
Breaking News
Breaking News
Foto

मनसेच्या मालवण प्रभारी तालुकाध्यक्षपदी युवा उद्योजक गॅरी अन्ननसिएशन यांची नियुक्ती

मालवण (प्रतिनिधी) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागील काही कालावधीपासून रिक्त असलेल्या मालवण तालुकाध्यक्ष पदाचा गुंता सोडवत प्रभारी तालुकाध्यक्ष पदी युवा उद्योजक गॅरी अन्ननसिएशन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी १८ मे रोजी मालवणात मनसेचा पदाधिकारी मेळावा होत असून या मेळाव्यात त्यांच्या अधिकृत निवडीची औपचारिक घोषणा करण्यात येणार आहे. या मेळाव्याला मनसेचे प्रदेश सरचिटणीस संदीप दळवी यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष धीरज परब, महिला जिल्हाध्यक्षा मोनिका फर्नांडिस, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, शहर अध्यक्ष सागर जाधव यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मालवणात मोठ्या कालावधीनंतर मनसेचे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सोमवारी १८ मे रोजी सकाळी ११ वाजता कुंभारमाठ शिवाजी पुतळा येथून भव्य रॅली काढून मनसे शक्तीप्रदर्शन करणार आहे. ही रॅली भरड बाजारपेठ मार्गे मालवण नगरपालिके नजिक हॉटेल मंदाकिनी येथे येणार असून याठिकाणी मनसेचा पदाधिकारी, कार्यकर्ता मेळावा होणार आहे. या मेळाव्यात तालुकाध्यक्षपदी गॅरी अन्ननसिएशन यांची नियुक्ती अधिकृत जाहीर होणार आहे. तरी मनसेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व महाराष्ट्र सैनिकांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg