दोडामार्ग : सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण व दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने समाज जागृती मंच, दोडामार्ग यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत छत्री, दप्तर (स्कूल बॅग), वह्या तसेच कंपास पेटीचे वाटप करण्यात येणार आहे. समाज जागृती मंचचे खजिनदार व सामाजिक कार्यकर्ते आयु. महेश जाधव सर (घोटगे-भिमनगर) यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. ही मदत प्रथम संपर्क साधणाऱ्या १० विद्यार्थ्यांपुरती मर्यादित असणार आहे.
या उपक्रमासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी खालील प्रतिनिधींशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्क: दीपक जाधव (अध्यक्ष) – 99670 69876 संतोष कदम (सचिव) – 94048 49425 शंभूर जाधव (सहसचिव) – 97653 22432 महेश जाधव (पुरस्कर्ते) – 94049 38394 “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून प्रेरणा घेत समाज जागृती मंच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असल्याचे आयोजकांनी सांगितले.




































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.