loader
Breaking News
Breaking News
Foto

डिझेल तुटवड्याने खेड एसटी स्थानकात संतप्त प्रवाशांचे बस रोको आंदोलन !

खेड (प्रतिनिधी) - इंधन तुटवड्याचा फटका आता सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या एसटी महामंडळालाही बसू लागला आहे. खेड बस स्थानकात डिझेल उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागात संध्याकाळी जाणाऱ्या वस्तीच्या एसटी बससेवांना मोठा विलंब झाल्याने संतप्त प्रवाशांनी बस रोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे काही काळ बस स्थानकातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामीण भागातील अनेक प्रवासी संध्याकाळच्या बसवर अवलंबून असतात. मात्र डिझेल उपलब्ध नसल्याने वस्तीच्या बस वेळेत सुटत नसल्याची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली. 'ग्रामीण भागातील बसेसना डिझेल नाही, तर लांब पल्ल्याच्या बसेसही जाऊ देणार नाही,' अशी भूमिका घेत संतप्त प्रवाशांनी स्थानकातून सुटणाऱ्या विविध एस्टी बससमोर उभे राहात बस रोको आंदोलन सुरू केले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे बसस्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक प्रवाशांची गैरसोय झाली असून काही बससेवा पूर्णपणे खोळंबल्या. आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलक प्रवाशांशी चर्चा केली. एसटी प्रशासनाकडून लवकरच डिझेल पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्यानंतर तब्बल तासभर सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, इंधन तुटवड्यामुळे एस्टी सेवांवर परिणाम होत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. विशेषतः दुर्गम भागातील प्रवाशांना याचा मोठा फटका बसत असून एसटी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशाकडून करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg