loader
Breaking News
Breaking News
Foto

वायंगणतड येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात १८ ते २१ मे दरम्यान 'पुनः प्रतिष्ठापना सोहळा'

तिलारी (प्रतिनिधी) : तालुक्यातील वायंगणतड येथे भक्तगणांच्या सहकार्यातून नव्याने उभारण्यात आलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिराचा भव्य 'पुनः प्रतिष्ठापना सोहळा' सोमवार, दि. १८ मे ते गुरुवार, दि. २१ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. समस्त ग्रामस्थ घोटगे-वायंगणतड आणि श्री सिद्धिविनायक कला, क्रीडा मंडळ यांच्या वतीने या चार दिवसीय सोहळ्याचे नेटके नियोजन करण्यात आले असून, यात विविध धार्मिक विधींसह सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. ​या सोहळ्यातील मुख्य मूर्ती प्रतिष्ठापना विधी बुधवार, दि. २० मे रोजी सकाळी ११:०० वाजताच्या शुभमुहूर्तावर संपन्न होणार असून त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच उत्सव काळात दररोज रात्री "उसन्या बायकोची वरात लग्नाची" व "चांदणे शिंपीत जा" ही नाटके, पारंपरिक दशावतारी नाट्यप्रयोग, समई नृत्य आणि भजनांचे कार्यक्रम रंगणार आहेत. तरी सर्व भाविकांनी या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होऊन तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg