loader
Breaking News
Breaking News
Foto

नदीतील वाळूला पर्याय ठरत असलेल्या क्रश सॅण्ड उद्योगाला शासनाची चालना

खेड - महाराष्ट्र शासनाने नदीपात्रातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी तसेच पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने कृत्रिम वाळू अर्थात एम-सॅण्ड (क्रश सॅण्ड) उद्योगाला प्राधान्य देत महत्त्वपूर्ण धोरणात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्यभरात सार्वजनिक तसेच खासगी बांधकाम प्रकल्पांमध्ये एम-सॅण्डच्या वापराला प्रोत्साहन दिले जात असून पर्यावरणपूरक बांधकाम साहित्याचा वापर वाढवण्यावर शासनाचा भर आहे. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील वेरळ येथे युवा उद्योजक अनिकेत सदानंद कदम यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेले साई क्रश सॅन्ड, हे जिल्ह्यातील पहिले एम-सॅन्ड प्रकल्प ठरत आहे. या प्रकल्पामुळे बांधकाम क्षेत्राला वर्षभर दर्जेदार आणि टिकाऊ वाळू उपलब्ध होत असून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीलाही मोठी चालना मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत बोलताना अनिकेत कदम यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या सकारात्मक धोरणांमुळे ग्रामीण भागात उद्योग उभारणीसाठी पोषक वातावरण निर्मण होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखत बांधकाम क्षेत्रासाठी पर्यायी साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमासाठी त्यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच महसूल राज्यमंत्री योगेशदादा कदम यांचे आभार मानले. एम-सॅन्ड म्हणजे हार्ड स्टोन, बेसॉल्ट किंवा ग्रॅनाईट दगड मोठ्या क्रशर मशीनद्वारे बारीक करून तयार करण्यात येणारी कृत्रिम वाळू होय. या प्रक्रियेत वॉशिंग आणि स्क्रीनिंग करण्यात येत असल्याने धूळ व मातीचे प्रमाण कमी राहते. परिणामी काँक्रीटची गुणवत्ता सुधारते आणि बांधकाम अधिक मजबूत व टिकाऊ बनते. सध्या घरबांधणी, काँक्रीट मिक्स, प्लास्टर, रस्ते, पूल, शासकीय इमारती, पेव्हर ब्लॉक तसेच विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये एम-सॅन्डचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नदी वाळूपेक्षा कमी खर्च, सहज उपलब्धता आणि एकसमान गुणवत्ता ही एम-सॅन्डची प्रमुख वैशिष्ट्ये मानली जात आहेत.

टाइम्स स्पेशल

महाराष्ट्र शासनाने अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी स्टोन क्रशर आणि एम-सॅन्ड युनिटसाठी परवाना, पर्यावरण मंजुरी तसेच साठवण नियम सक्तीचे केले आहेत. अवैध उत्खननावर दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली असून सार्वजनिक बांधकामांमध्ये पर्यायी वाळू वापराला प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. दरम्यान, तालुक्यातील वेरळ येथील साई क्रश सॅन्ड प्रकल्पामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्राला पर्यावरणपूरक आणि विश्वासार्ह पर्याय उपलब्ध झाला असून भविष्यात अशा उद्योगांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा अनिकेत कदम यांनी व्यक्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg