loader
Breaking News
Breaking News
Foto

अक्षय्य तृतीयेला सोन्याची चमक, बाजारपेठा गजबजल्या

अलिबाग (वार्ताहर)- साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून ओळखल्या जाणार्‍या अक्षय्य तृतीयेला वाहन खरेदी, सोने, गृहप्रवेश, नवीन दुकानांची उद्धाटने यांसारख्या गोष्टींना विशेष महत्व दिले जाते. रविवारी साजर्‍या झालेल्या अक्षय्य तृतीयेचा अनेकांनी मुहूर्त साधल्याचे पहायला मिळाले. जिल्ह्यात ठिकठिकाणी अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने, चांदी खरेदी करण्यासाठी महिलाची जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील ज्वेलरच्या दुकानात रेलचेल सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. तसेच गाडीच्या शोरूममध्ये टु व्हिलर, फोर व्हीलर गाडी खरेदी करण्यासाठी, प्लॉट खरेदी करण्यासाठी नागरीकांची रेलचेल सुरू असल्याचे चित्र दिसून येत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सनातन धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. सोनेही खरेदी केले जाते. सोन्याचे दागिने अक्षय्य तृतीयेला खरेदी केले जातात. हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. यावर्षी अक्षय्य तृतीयाचा मुहूर्त 19 एप्रिल रोजी आल्याने साखरपुडे, लग्न समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने, चांदी खरेदी करण्यासाठी महिलांची ज्वेलरच्या दुकानात रेलचेल सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळतेय.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg