मालवण (प्रतिनिधी) - जय भवानी... जय शिवाजी... छत्रपती शिवाजी महाराज की जय... अशा घोषणा देत... ढोल ताशांचा गजर करीत... मर्दानी खेळ सादर करीत आणि घोषवादनातून शिवरायांना मानवंदना देत मालवण येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात पारंपारिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमाराची राजधानी असलेला तसेच जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता प्राप्त सिंधुदुर्ग किल्ल्यातील श्री शिवराजेश्वर मंदिरात इ.स. १६९५ पासून छत्रपती राजाराम महाराज यांनी शिवजन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू केली होती. ही परंपरा आजतागायत अखंडपणे ३३१ वर्षे जोपासली जात आहे. या परंपरेनुसार मालवणातील शिवप्रेमीनी एकत्र येत शिवजयंती साजरी केली. प्रारंभी स्वराज्य ढोल पथकाद्वारे ढोल ताशा वादन करण्यात आले. त्यानंतर मर्दानी खेळ सादर झाले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात व्यासपिठावर प्रमुख वक्ते शिवशंभू विचारमंचचे महाराष्ट्र संयोजक सुधीर थोरात, कार्यक्रमाचे अध्यक्ष व शिवराजेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी सकपाळ, वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीचे सरपंच भगवान लुडबे, मंदिराचे सेवेकरी श्रीराम सकपाळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा संघचालक अरविंद कुडतरकर, जिल्हा कार्यवाह विनय धावले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील आठ तालुक्यातून आलेले आठ प्रतिनिधी, नगरसेवक रविकिरण तोरसकर, तपस्वी मयेकर, मंदार ओरसकर, ललित चव्हाण यांच्यासह रिल्स स्पर्धा पारितोषिक पुरस्कर्ते व उत्सवासाठी सहकार्य करणाऱ्यांचे सन्मान करण्यात आले. त्यानंतर शिवजन्माच्या मुहूर्तावर शिवराजेश्वर मंदिरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवक संघ सिंधुदुर्गतर्फे घोषवादन करून शिवरायांना मानवंदना देण्यात आली. शिवआरती होऊन सांगता झाली. त्यानंतर उपस्थित शिवप्रेमीनी महाप्रसादाचा लाभ घेतला.























































































2.jpg)





























.jpg)






























































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.