loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा येथे 'स्वयंपूर्तता फाऊंडेशन'द्वारे अंगणवाडी सेविकांसाठी विशेष कार्यशाळा संपन्न: 'ॲनिमिया मुक्त भारत' मोहिमेचा शुभारंभ

​केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - ग्रामीण भागातील आरोग्य आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलत, 'स्वयंपूर्तता फाऊंडेशन' आणि जिल्हा एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'ॲनिमीया मुक्त भारत, या मोहिमेचा शुभारंभ लांजा येथे 18 एप्रिल रोजी उत्साहात पार पडला. जिल्हा परीषद शाळा नंबर 5 येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट 'ॲनिमिया मुक्त भारत' या मोहिमेबाबत अंगणवाडी सेविकांमध्ये जनजागृती करणे आणि त्यांच्या भविष्यातील प्रगतीसाठी 'मदतसिनी' उपक्रमाद्वारे त्यांना सक्षम करणे हे होते. रत्नागिरी जिल्ह्यातील या उपक्रमाची सुरुवात लांजा येथून करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला जिल्हा कार्यक्रम अधिकारी मलिनाथ कांबळे, लांजा गटविकास अधिकारी हिंदुराव गिरी, फाउंडेशनचे स्वस्तिक रंबाडे (जिल्हा व्यवस्थापक), रोहन घोळम (समन्वयक), तुषार मांगलेकर (तालुका प्रभारी) आदी मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी अंगणवाडी सेविकांना ॲनिमियाच्या समस्येशी लढा कसा द्यावा, याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, अंगणवाडी सेविकांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक भविष्यासाठी 'मदतसिनी' हा उपक्रम राबवून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. उपस्थित मान्यवर यांनी अंगणवाडी सेविका या ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा आहेत. स्वतःचे आरोग्य जपत, समाजातील माता आणि बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी त्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा असे मार्गदर्शन केले. सदर उपक्रम संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात राबवला जाणार आहे ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर महिला आणि बालकांच्या आरोग्यात सकारात्मक बदल दिसून येतील, असा विश्वास फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच अधिक माहितीसाठी स्वयंपूर्तता फाऊंडेशनच्या स्थानिक प्रतिनिधींशी किंवा तालुका एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वयंमपुर्तता फाऊंडेशन च्या पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg