loader
Breaking News
Breaking News
Foto

अवैध अमली पदार्थ वाहतुकीला आळा घालण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांकडून विशेष तपासणी मोहीम

बांदा (प्रतिनिधी) - जिल्ह्यात अवैध अमली पदार्थ वाहतुकीला आळा घालण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिसांकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नियोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा चेकपोस्ट येथे श्वान पथकाच्या सहाय्याने विशेष तपासणी करण्यात आली. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे तसेच बांदा पोलीस सहाय्यक निरीक्षक पंकज शिंदे यांच्या उपस्थितीत बांदा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. श्वानाच्या सहाय्याने वाहनांची तपासणी करून नार्कोटिक्स ड्रग्ज तसेच अवैध अमली पदार्थ वाहतुकीची कसून पडताळणी करण्यात आली. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी तसेच अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या तपासणी मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg