loader
Breaking News
Breaking News
Foto

बोरिवलीत रणरागिणींनी नाचविली सातमाई न्हवानकरीन देवीची पालखी

बोरिवली (सागर गोवळे) - दापोली तालुक्यातील बोरिवली (आडिवाडी) गावात, कोकणच्या लाल मातीत भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. ग्रामदैवत आई सातमाई न्हवानकरीन देवीच्या वार्षिक पालखी उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून आडिवाडी परिसरात चैतन्याचे वातावरण आहे. ‘आई सातमाई न्हवानकरीन देवीच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषाने अवघा डोंगरदर्‍याचा परिसर दुमदुमून गेला. ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत देवीची पालखी जेव्हा मंदिराबाहेर पडली, तेव्हा भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. यावेळी मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे गावातील ‘नारीशक्ती’चे प्रेरणादायी दृश्य! गावातील तरुण रणरागिणींनी पालखी आपल्या खांद्यावर घेतली. पुरुषांच्या बरोबरीने, किंबहुना एक पाऊल पुढे टाकत, या तरुण महिलांनी ज्या लिलया आणि जोशात पालखी नाचवली, ते पाहून उपस्थित भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. पालखी नाचविताना महिलांचा उत्साह आणि समन्वय वाखाणण्याजोगा होता. तरुण पिढीने जुनी गाणी तमाशात सादर केल्याने जुन्या जाणत्यांनीही तरुण पिढीच्या ऊर्जेचे कौतुक केले. गावातील आबालवृद्ध या सोहळ्यात सामील झाले असून, बोरिवली गाव भक्तीच्या रंगात न्हाऊन निघत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg