loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यात 75,000 पदांवर होणार भरती, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

मुंबई - राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 सध्या सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी राज्यात 75 हजार पदांची पदभरती होणार असल्याची घोषणा केली. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी राज्यात 75000 पदांची पदभरती होणार असल्याची घोषणा केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आर्थिक व सामाजिक गरजानुसार प्रशासकीय व्यवस्थेची पुनर्रचना करणे, अधिकारी-कर्मचारी यांचे सेवाप्रवेश ते निवृत्तीपर्यंतच्या सेवाप्रक्रिया स्वयंचलित पद्धतीने करणे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या व खाजगी क्षेत्राच्या सहाय्याने नागरी सेवा पुरविण्यात अव्वल राज्याचा दर्जा प्राप्त करण्याचे ध्येय आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

टाईम्स स्पेशल

विकसित महाराष्ट्र - 2047 कडे वाटचाल करीत असताना पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी सुशासनाचे उद्दिष्ट साध्य करणे आवश्यक ठरते. त्याकरिता सर्व प्रशासकीय विभागांचे सेवाप्रवेश नियमांचे एकत्रीकरण, प्रमाणीकरण व सुलभीकरण करण्यात आले आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर आत्तापर्यंत 1 लाख 20 हजार पदभरती करण्यात आली असून पुढील कालावधीत टप्याटप्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर यंत्रणांमार्फत 75 हजार पदांची पदभरती करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg