loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाणे महापालिकेची पाणीपट्टी वसुली मोहीम तीव्र; सात दिवसांत 4.22 कोटींची वसुली

ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून 27 फेब्रुवारी ते 05 मार्च 2026 या कालावधीत शहरातील विविध प्रभाग समित्यांमधून एकूण 4 कोटी 22 लाख 35 हजार 750 रुपयांची वसुली करण्यात आली आहे. थकीत देयकदारांवर कठोर कारवाई करत 103 पाणी जोडण्या तोडण्यात आल्या असून 177 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या असून 3 ठिकाणचे पंप जप्त करण्यात आले. तर 1 पंप रुम सील करण्यात आला आहे. या कालावधीत प्रभाग समितीनिहाय वसुलीमध्ये मानपाडा प्रभाग समितीतून 1, कोटी 14 लाख 65 हजार 750 रुपयांची वसुली करण्यात आली. कळवा प्रभाग समितीतून 59 लाख, 05 हजार 557 रुपयांची वसुली करण्यात आली असून 35 जणांचे नळ संयोजन खंडीत करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नौपाडा प्रभाग समितीतून 52,लाख 98 हजार 941 रुपयांची वसुली करण्यात आली तर 31 जणांची नळसंयोजने खंडीत करण्यात आली तर 60 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. वर्तकनगर प्रभाग समितीतून 49,लाख 94 हजार 751 रुपयांची वसुली करण्यात आली असून 5 जणांची नळसंयोजने खंडीत करण्यात आली तर 20 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच उथळसर प्रभाग समितीतून 36 लाख 61 हजार,836 रुपयांची वसुली करण्यात आली असून 4 जणांची नळसंयोजन खंडीत करण्यात आली. लोकमान्य-सावरकर नगर प्रभागातून 31 लाख 37 हजार 858 रुपयांची वसुली करण्यात आली असून 10 जणांची नळसंयोजने खंडीत करण्यात आली असून 97 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

वागळे प्रभागातून 25 लाख, 13 हजार 857 रुपयांची वसुली करण्यात आली. दिवा प्रभागातून 23 लाख 64, हजार 631 रुपयांची वसुली करण्यात आली असून 18 जणांची नळसंयोजने खंडीत करण्यात आली तर 3 ठिकाणचे पंप जप्त तर 1 पंप रुम सील करण्यात आला. मुंब्रा प्रभागसमितीतून 16,लाख 60, हजार 158 रुपयांची वसुली करण्यात आली. तर नागरी सुविधा केंद्राअंतर्गत 12 लाख,32 हजार 411 रुपयांची वसुली करण्यात आली. महापालिकेची ही वसुली मोहिम यापुढेही अधिक तीव्र होणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले असून नागरिकांनी थकीत पाणीपट्टी तातडीने भरून कारवाई टाळावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg