ठाणे (प्रतिनिधी) - पुण्याच्या बाजार पेठ परिसरात राहणाऱ्या तरुणाला जीवन प्राधिकरणाच्या परीक्षेसाठी मुंबईत आल्यानंतर ठाणे स्थानकावर त्याचा अज्ञात चोरट्याने मोबाईल लांबवल्याची घटना घडली यापूर्वीच दोन दिवसांपूर्वी हिंगोली वरून मुंबई पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लांबविण्याची घटना घडली, असतानाच पुन्हा एकदा ही घटना ठाणे स्थानकावर घडल्याने विद्यार्थी टार्गेट होत आहेत की काय असा प्रश्न आता निर्माण होत असून या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहे.
पुणे, गुरूवार पेठ येथे राहणारा ओंकार युवराज देवकर (वय २८) हा तरुण एमपीएससीची तयारी करत असून ५ मार्च रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची परीक्षा देण्यासाठी तो मुंबईतील पवई येथे आले होते. परीक्षा आटोपल्यानंतर तो पुन्हा पुण्याकडे जाण्यासाठी रात्री सुमारे ८.५२ वाजता ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ७ वर आला. यावेळी हुबळी एक्सप्रेस गाडीत मोठी गर्दी असल्याने तो मोटरमनच्या बाजूच्या दुसऱ्या जनरल डब्यात चढताना त्यांच्या पँटच्या उजव्या खिशात ठेवलेला मोबाईल फोन अनोळखी चोरट्याने घेऊन पोबारा केला. चोरीला गेलेल्या मोबाईल फोनची किंमत सुमारे १८ हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)




























































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.