खेड (प्रतिनिधी): अखंड कोकणात पारंपरिक उत्साहात शिमगोत्सव साजरा होत असतानाच खेड तालुक्यातील लवेल गावात मात्र यंदाचा शिमगा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. गावातील एकूण दहा वाड्यांनी एकत्र येत शिमगोत्सवावर जाहीर बहिष्कार टाकला असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीविरोधात तीव्र निषेध नोंदवला आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाने सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. शिमगा हा गावाच्या एकात्मतेचा आणि परंपरेचा सण असला तरी न्याय आणि हक्कांसाठी लढा देणे अधिक महत्त्वाचे असल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर रात्री उशिरापर्यंत गावातील सर्व वाड्यांतील नागरिक एकत्र जमले. सणाच्या दिवशीही ढोल-ताशांच्या गजराऐवजी ग्रामसभा रंगली. पहाटे चार वाजेपर्यंत ग्रामस्थ एकत्र बसून चर्चा करत होते. प्रशासनाच्या भूमिकेविरोधात घोषणाबाजी करत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. गावकऱ्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, जोपर्यंत त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही, तोपर्यंत शिमगोत्सवासह इतर कार्यक्रमांबाबतही कठोर भूमिका घेतली जाईल. परंपरा जपताना गावाचा सन्मान आणि न्याय अबाधित राहावा, हीच आमची भूमिका असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले. दरम्यान, या बहिष्कारामुळे परिसरात चर्चांना उधाण आले असून प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.