सावंतवाडी : बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाइन आर्ट (अप्लाइड आर्ट), सावंतवाडी येथील २८ वे वार्षिक कला प्रदर्शन ‘कल्पक’ याचे उद्घाटन महाविद्यालयात प्रसिद्ध जाहिरात तज्ज्ञ व आंतरराष्ट्रीय ज्यूरी सदस्य संतोष पाधी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने थाटामाटात संपन्न झाले. कै. बाळभाई बांदेकर यांच्या शिक्षणप्रेमी विचारातून आणि कै. वासुदेव निब्रे तसेच संस्थाध्यक्ष रमेश भाट यांच्या अथक प्रयत्नांतून उभे राहिलेले हे कला महाविद्यालय गेली २८ वर्षे सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक कला शिक्षण देत आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उत्कृष्ट कलाकृतींचा देखणा आविष्कार या प्रदर्शनात पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध जाहिरात तज्ज्ञ व आंतरराष्ट्रीय ज्यूरी सदस्य संतोष पाधी उद्घाटक म्हणून तर प्रमुख पाहुणे म्हणून ख्यातनाम इलस्ट्रेटर, डिझायनर व आर्ट डायरेक्टर दिलीप खोमणे, महेश साळगावकर उपस्थित होते. आपल्या मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे, सादरीकरणातील व्यावसायिकतेचे आणि संकल्पनांच्या परिपक्वतेचे विशेष कौतुक केले.
उपस्थित मान्यवरांनी बी. एस. बांदेकर कॉलेजच्या कला क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि दर्जेदार कार्याचे गौरवोद्गार काढत, ग्रामीण भागातून इतक्या सक्षम कलाकारांची जडणघडण होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या कामातील संकल्पनाशक्ती, सादरीकरणातील नीटनेटकेपणा आणि व्यावसायिक दृष्टीकोन विशेषत्वाने अधोरेखित करण्यात आला. प्रथम वर्ष ते अंतिम वर्ष अशा चारही वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या असून दि. ८ मार्च पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन कला रसिकांसाठी खुले राहणार आहे. उद्घाटन दिनीच पारितोषिक वितरण समारंभही उत्साहात पार पडला. या प्रदर्शनास कला रसिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन संस्थाध्यक्ष श्री रमेश भाट आणि महाविद्यालयाचे प्राचार्य उदय वेले यांनी केले. परीक्षणासाठी जे जे महाविद्यालयाचे माजी प्रा. सुनील नांदोसकर, रामदास निवेलकर, संतोष पाधी, दिलीप खोमणे यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय वेले आणि प्रा. चेतन जगताप यांनी केले, बक्षीस वितरण सूत्रसंचालन प्रा. सिद्धेश नेरुरकर, प्रा. प्राजक्ता कुंभार यांनी केले तर आभार प्रदर्शन विभाग प्रमुख तुकाराम मोरजकर यांनी केले. प्रा. यावेळी राधा गावडे, प्रा. आत्माराम शिरोडकर, प्रा. तुळशीदास नाईक, प्रा. धनंजय परब, अनिल बांदेकर, सुभाष राव, पल्लवी गावडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी चारुदत्त शंकरदास, तन्वी गावडे, विजय झोरे, कृष्णा पालयेकर तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)





























































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.