ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे रेल्वे स्थानकावर गर्दी आणि लोकलच्या डब्ब्यातील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने खोपोलीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये पुण्याकडे निघालेल्या छगण मोहन आडागंळे (५४) यांचा मोबाईल ठाणे स्थानकावर उतरताना चोरट्यानी चोरल्याची घटना 3 मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. तक्रारदराने अज्ञात चोरट्याच्या विरोधात ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुणे- चिंचवड, वाल्हेकर वाडी येथे राहणारे छगण मोहन आडागंळे (५४) हे आपल्या मुलीसह मुलुंड येथे अंधव्यक्तींना मिळणारे रेशन घेण्याकामी आले होते. तेथून पुण्याकडे जाण्यासाठी त्यांनी सकाळी सुमारे ८.०६ वाजता मुलुंड येथून डाउन खोपोली फास्ट लोकलने प्रवास सुरू केला.
सदर लोकल सकाळी ८.१० वाजता ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ५ वर आली. गर्दीतून उतरत असताना त्यांच्या पॅन्टच्या उजव्या खिशात ठेवलेला सुमारे १६ हजार ५०० रुपये किमतीचा मोबाईल चोरट्याने लांबवला. फलाटावर उतरल्यावर मोबाईल नसल्याचे लक्षात येताच त्यांनी इतर प्रवाशांच्या फोनवरून संपर्क साधला; मात्र काही वेळ रिंग जाऊन मोबाईल बंद लागला. याप्रकरणी आडागंळे यांनी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.