loader
Breaking News
Breaking News
Foto

नारिंगी नदीपात्रातील गाळ उपसा सुरू, नगराध्यक्षा माधवी बुटाला यांचा पुढाकार

खेड - येथील नारिंगी नदीपात्रातील रखडलेल्या गाळ उपसा कामाला अखेर मुहूर्त मिळाला असून नगराध्यक्षा माधवी बुटाला यांच्या हस्ते या कामाचा नुकताच शुभारंभ झाला. गतवर्षी नदीपात्रातून ३१६८ ब्रास म्हणजेच ८९६५ घनमीटर गाळ उपसण्यात आला होता. मात्र, यंदा गाळ उपसा प्रक्रिया थांबली होती. रखडलेली गाळ उपसा प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मंजूर केलेल्या निधीतून जगबुडी नदीपात्रातून गाळ उपसा प्रक्रिया वेगाने सुरू आहे. नारिंगी नदीपात्रातही मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. गेल्या अनेक वर्षापासून नारिंगी नदीपात्रातून गाळ उपसण्यात न आल्याने पावसाळ्यात पुराची टांगती तलवार कायमच होती. गतवर्षी नाम फाऊंडेशनने दोन पोकलेन मशिनच्या सहाय्याने नदीपात्रातील गाळ उपसण्यासाठी पुढाकार घेतला होता. पावसापूर्वी नारिंगी नदीपात्रातून ३१६८ ब्रास गाळ उपसा करण्यात आल्याने पावसाळ्यात पुराच्या पाण्याची टांगती तलवार काही अंशी दूरही झाली होती. अखेर नगराध्यक्षा माधवी बुटाला यांनी गाळ उपसण्यासाठी पुढाकार घेतला. नारंगी नदीकडील देवणा पुलाखालील गाळ उपसा करण्याचे काम सोमवारपासून सुरू झाले. सुसेरी पुलापर्यंत गाळ उपस करून कासार आळी, ब्राह्मणआळी सोनार आळी या भागातील पुराच धोका कमी करण्याची उपाययोजन म्हणून नारंगी नदीपात्रातील गाळ उपसा प्रक्रिया वेगाने राबवण्यात येणार आहे. या प्रसंगी शहरप्रमुख कुंदन सातपुते, नगरसेवक स्वप्निल सैतवडेकर, नगरसेविका स्वप्नाल चव्हाण, रेश्मा खतीब, सुयश लंबाडे, सिद्धांत घटे, राकेश चव्हाण आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg