loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेल महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदांसाठी शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल

पनवेल : पनवेल महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज आज पनवेल महानगरपालिका येथे निवडणूक अधिकारी नानासाहेब कामठे यांच्याकडे दाखल केला. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बाळासाहेब माने, उपनेते बबनदादा पाटील, संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, सहसंपर्क प्रमुख अनिल चव्हाण, गटनेता लीना गरड, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, पनवेल विधानसभा संघटक दीपक निकम, नगरसेवक उत्तम मोर्बेकर, प्रगती पाटील, कैलास पाटील, शहरप्रमुख प्रवीण जाधव, ऍड. समाधान काशीद, मा तालुकाप्रमुख रामदास पाटील यांच्यासह इतर शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी बोलताना उपनेते बाळासाहेब माने यांनी सांगितले कि, आमचे जुने शिवसैनिक दिव्यांग बांधव नितीन गावंड यांना उमेदवारी देऊन ते त्यांच्या पदाचा उपयोग पनवेल परिसरातील दिव्यांग बांधवांना महापालिकेच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी काम करतील असा विश्वास व्यक्त केला. तर उपनेते बबनदादा पाटील यांनी सुद्धा महानगरपालिकेच्या माध्यमातून लादण्यात आलेला मालमत्ता कर विरोधात आमचे सर्व नगरसेवक सक्षम विरोधक म्हणून काम करतील असे नमूद केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg