loader
Breaking News
Breaking News
Foto

देवळेतील वैश्य युवक मंडळाचा 41 वा वर्धापन दिन सोहळा संपन्न

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील वैश्य युवक मंडळ मुंबई रजिस्टर यांचा 41 वा वर्धापन दिन यावर्षी शनिवार दि. 7 /3/23 शिमगा उत्सवातून विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. आ. भैय्या सामंत यांनी वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. तसेच विकास कामे थांबणार नाहीत असे म्हटले. कुंभार वाडीतील योजनेसाठी 5 लाख दिल्याचेही या सांगितले. या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मांडावर दुपारी सत्यनारायणाची महापूजा सायंकाळी 5 वाजता हळदी कुंकू समारंभ रात्री 7 ते 8 वा. सुस्वर भजन रात्री 9 ते 10 वा.वर्धापन दिन सोहळा व सत्कार समारंभ पार पडला. तसेच विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण ही करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर आमदार किरण उर्फ भैय्या सामंत, शिवसेना जिल्हा परिषद गट नेता विलास चाळके, जि.प.सदस्या रजनी चिंगळे, राजापूर लांजा साखरपा क्षेत्र प्रमुख राजूशेठ कुरूप, विलास बेर्डे, प्रसाद अपंडकर, बापू शिंदे हे उपस्थिती होते. या वर्धापन दिनानिमित्त रात्रो ठीक दहा वाजता महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम सचिन मोटे लिखित धमाल दोन अंकी विनोदी नाटक" भटाची बायपास" सादर करण्यात आले. या नाटकातील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली. मंडळाचे अध्यक्ष विजय परशेट्ये, सचिव संजय काळोखे, खजिनदार विकास परशेट्ये वैश्य युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg