loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्रामदैवत गिरोबाचा शिमगोत्सव

सावंतवाडी : सिंधुदुर्गातील सांगेली गावात फणसाच्या झाडाला ग्रामदैवत गिरोबा म्हणून दैवत मानलं जातं आणि त्याची प्रतिष्ठापना केली जाते. होळी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला हा सोहळा मोठ्या थाटात पार पडला. ही आगळीवेगळी पंरपरा पूर्वापास सुरु आहे. यावर्षी गिरिजानाथाच्या मूर्ती प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. "हर हर महादेव" च्या जयघोषात लाखो भाविकांच्या उपस्थितीत गिरोबाची प्रतिष्ठापना करण्यात आली. तळकोकणात सण म्हटल की वेगवेगळ्या रूढी परंपरा पहायला मिळतात. गणेशोत्सवानंतर कोकणातील मोठा सण म्हणजे शिमगोत्सव. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळीच्या आदल्या दिवशी पासून शिमगोत्सव सुरू होतो. अशीच एक आगळीवेगळी पूर्वापार चालत आलेली परंपरा सावंतवाडीत सांगेली या गावात सुरू आहे. या गावात देव म्हणून फणसाच झाड ग्रामस्थ एकत्र येत ठरवतात. ते झाडं तोडून गोलाकार आकार देऊन त्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते आणि मध्यरात्री विधीवत प्राणप्रतिष्ठापणा करून मंदीरात ठेवलं जातं. सांगेली गावचं ग्रामदैवत झाड असलेले हे देशातील एकमेव मंदिर आहे. हिंदू संस्कृतीत वड, औदुंबर, पिंपळ अशा वृक्षांना दैवत्व मानलं जातं. अशीच एक परंपरा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली गावात फणसाच्या झाडाला गिरोबा म्हणून दैवत्व मानलं जातं.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg