loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी-कोलगाव पाणीप्रश्नी सकारात्मक चर्चा; कायमस्वरूपी तोडगा निघणार!

सावंतवाडी (प्रतिनिधी) - कोलगाव ग्रामस्थांच्या पाणीप्रश्नाबाबत सावंतवाडी नगर परिषदेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर आणि जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळात झालेली ही चर्चा सकारात्मक ठरली असून, लवकरच यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही दोन्ही बाजूंनी देण्यात आली आहे. सुमारे १.५ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या पाळणे कोंड धरण प्रकल्पातील पाणी कोलगाव गावासह सावंतवाडी शहरालाही मिळणार आहे. या प्रकल्पाचे राहिलेले अपूर्ण काम तातडीने पूर्ण करून दोन्ही भागांना जास्तीचा पाणीपुरवठा करण्यासाठी नगर परिषद प्रयत्नशील असल्याचे ॲड. निरवडेकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान कोलगावातून जाणाऱ्या पाईपलाईन मधून हे पाणी नरेंद्र डोंगराच्या डोंगरावर उभारण्यात आलेल्या साठवण टाकीमध्ये दिले जाणार असून तेथून सावंतवाडी शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे २४ तास पाणी शहरवासी या नळपाणी योजनेतून मिळणार आहे. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा प्रभारी नगराध्यक्ष निरवडेकर यांनी व्यक्त केली आहे. कोलगावमधून जाणाऱ्या नळपाणी योजनेचे काम सध्या रखडलेले आहे. या पार्श्वभूमीवर मायकल डिसोझा यांनी आक्रमक पवित्रा घेत काम थांबवण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात तातडीने बैठक बोलावण्यात आली होती. कामाला गती देण्यासाठी आवश्यक असलेला कायदेशीर करार लवकरच पूर्ण केला जाईल. या योजनेमुळे केवळ कोलगावच नव्हे, तर सावंतवाडी शहराची पाण्याची गरजही भागणार आहे. तांत्रिक अडचणी दूर करून थांबलेली कामे तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत ग्रामस्थांच्यावतीने जि.प. सदस्य मायकल डिसोझा यांनी केले. यावेळी पंचायत समिती सदस्य प्रणाली टिळवे, कोलगाव ग्रामपंचायत सदस्य निशिकांत पडते, बाळू गवस, मारिया डिमेलो, शिवदत्त घोगळे, शैलेश टिळवे आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. "कोलगावच्या हक्काच्या पाण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. आवश्यक करार करून लवकरच हे काम पूर्ण करू, जेणेकरून कोलगाव आणि सावंतवाडी शहराला दिलासा मिळेल." असे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg