loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेनेच्या वतीने ​सावंतवाडीत ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन होणार साजरा

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी विधानसभा मतदार संघातर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने शुक्रवार, ८ मार्च रोजी येथील जनरल जगन्नाथराव भोसले गार्डनमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ४ ते ८ या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे. ​महिलांचा आत्मसन्मान वाढावा आणि समाजात त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव व्हावा, या उद्देशाने आयोजित या सोहळ्यात विविध क्षेत्रातील १५ कर्तृत्ववान महिलांचा सत्कार केला जाणार आहे. यासोबतच महिलांसाठी 'प्रश्नमंजुषा' आणि विविध 'फनी गेम्स'चे आयोजन करण्यात आले आहे. महिलांनी आत्मनिर्भर व्हावे या दृष्टीने यावेळी मार्गदर्शनही केले जाईल. तसेच युवतींनी स्वप्रेरणेने बसवलेले मनोरंजनात्मक कार्यक्रम हे या सोहळ्याचे खास आकर्षण असणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​या कार्यक्रमास माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आणि माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून त्यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. ​स्त्री हा समाजातील महत्त्वाचा घटक असून तिचा सन्मान राखणे हे सर्वांचे कर्तव्य आहे, असे मत शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ॲड. व नोटरी नीता सावंत-कविटकर यांनी व्यक्त केले आहे. ८ मार्च रोजी सावंतवाडीतील जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg