ठाणे (प्रतिनिधी) - "टकल्या अंकलने पाईप लगाया है" असे उद्गार काढले. या गोष्टीचा राग आलेल्या कोलशेत परिसरात २३ वर्षीय राकेश मुत्तल या शेजाऱ्याने एका नऊ वर्षांच्या मुलाच्या श्रीमुखात मारल्याची घटना ठाण्यात घडली. तसेच “जिथे मुलगा दिसेल तिथे पुन्हा मारेल,” अशी धमकी दिल्याप्रकरणी कापुरबावडी पोलिस ठाण्यात अल्पवयीन न्याय कायदा २०१५ च्या कलम ७५, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३५२, ३५२(२),११५ (२) अन्वेय गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
४ मार्च रोजी सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास तक्रारदार अनिलकुमार गुप्ता यांनी घराबाहेर असलेल्या त्यांच्या मुलगा धुरव (वय ९) याला बाहेरील नळाला पाईप कोणी लावला आहे का, अशी विचारणा केली. त्याच्यावर मुलाने “टकला अंकलने पाईप लावला आहे,” असे सांगितले. ही बाब शेजारी राहणारे राकेश मुत्तल याच्या कानावर गेली. त्यावेळी त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान, रात्री साडेअकराच्या सुमारास गुप्ता घरी परतले असता राकेश मुत्तल हे त्यांच्या घरी आले आणि धुरव याला बाहेर बोलावले. मुलगा बाहेर आल्यानंतर मुतल यांनी त्याच्या श्रीमुखात मारल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे मुलगा मोठ्याने रडू लागल्याने गुप्ता यांनी त्यांना जाब विचारला असता, त्याने शिवीगाळ करत “जिथे मुलगा दिसेल तिथे पुन्हा मारेल,” अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी कापुरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)




























































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.