loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडीत मोफत हृदय रोग तपासणी शिबिराचे आयोजन

सावंतवाडी: किम्स हॉस्पिटल्स, ठाणे यांच्या वतीने सावंतवाडी येथे लहान मुलांसाठी (० ते १८ वर्षे वयोगट) मोफत हृदय रोग तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवार, २० मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे पार पडणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या शिबिरात प्रसिद्ध बालहृदयविकार तज्ज्ञ डॉ. श्रीनिवास ल. (मुख्य आणि वरिष्ठ सल्लागार, इंटरव्हेंशनल पीडियाट्रिक कार्डिओलॉजी) रुग्णांची तपासणी करतील. शिबिरादरम्यान रुग्णांची मोफत नाव नोंदणी आणि मोफत २डी इको (2D Echo) तपासणी केली जाणार आहे. ज्या मुलांमध्ये वारंवार न्युमोनिया होणे, बाळ निळे पडणे, वजन न वाढणे, वेगाने श्वास घेणे, त्वचा किंवा नखे निळी पडणे किंवा जास्त घाम येणे अशी लक्षणे आढळतात, अशा मुलांच्या पालकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ​नाव नोंदणीसाठी संपर्क: अपॉइंटमेंटसाठी ८६५५६०४६१७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg