loader
Breaking News
Breaking News
Foto

कामगार योजनांबाबत चिंता; लेबर ऑफिसरची नियुक्तीची मागणी

रत्नागिरी: बांधकाम कामगार सहय्यक संघाचे अध्यक्ष नारायणराव खोराटे यांनी रत्नागिरी जिल्हा कल्याणकारी मंडळाचे सहाय्यक आयुक्त संदेश आयरे यांची महाराष्ट्र कामगार संघटनेच्या अध्यक्ष म्हणून भेट घेतली. या भेटीत बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनांच्या अमलबजावणी मध्ये होत असलेल्या दिरंगाईबाबत विस्तृत चर्चा झाली चर्चेतील मुद्दे खालील प्रमाणे १) गरोदर महिला बांधकाम कामगार यांना गेले एक वर्षापासून मिळणारा बंद अथवा स्थगित दिसतो याचे कारण? २)बांधकाम कामगाराचा फॉर्म ऑनलाईन सबमिट केल्यापासून ६ ते ८ महिने एवढा कालावधी मंजुरीचा संदेश त्या कामगाराला येण्यास जात आहे असे का ? सदर कालावधीमध्ये त्या कामगाराचे स्वतःचे अथवा नामनिर्देशित व्यक्तीचे काही बरे वाईट झाल्यास त्याला जबाबदार शासन राहणार का ? ३) नोंदीत कामगारांच्या मुलांचे शिष्यवृत्तीचे लाभ ही वेळेत मिळत नाहीत व तो पर्यंत त्या कामगारांची नोंद वैधता कालावधी संपुष्टात आलेला असतो परिणामी त्या कामगाराच्या मुलांचे शैक्षणिक लाभाचे नुकसान होतेच परंतु शिक्षणावरील खर्च वाढता असल्यासाने परिणामी त्या कामगाराचा मुलगा अथवा मुलगी शैक्षणिक पात्रता असून देखील शिक्षणापासून वंचित राहतात, याचे कारण काय ? ४) बांधकाम कामगारांचे मृत्यू पश्चात मिळणारा कुटुंबाला विमा तसेच किरकोळ दुखापती साठीचा लाभ ही मिळण्यास खूप विलंब होत आहे. परिणामी कामगार फेऱ्या मारून हैराण होऊन सदर लाभाची आशाच सोडून देतात. ही अन्यायकारक बाब कधी थांबणार ? ५) या पूर्वी बांधकाम कामगाराना गृहोपयोगी वस्तू संच, सुरक्षा संच व आवश्यक वस्तू संच एकाच वेळी मिळत नाही असे का ?

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सहाय्यक आयुक्त अहिरे यांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्ह्यात आरआरओ (आरओ) ऑफिसर-फॉर्म क्लिअर करणारे अधिकारी गेल्या वर्षापासून उपलब्ध नाहीत. अध्यक्ष खराटे यांनी सांगितले की, कामगार मंत्री महोदयांची भेट घेऊन आरआरओ/लेबर ऑफिसरची लवकरात लवकर नियुक्ती करण्याची मागणी असलेले पत्र देणार आहेत. यामुळे पुढील कामकाज गती मिळेल.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg