loader
Breaking News
Breaking News
Foto

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान; श्रीवर्धन प्रशासनाची पत्रकार परिषदेत माहिती

श्रीवर्धन (विजय गिरी) : सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न जलदगतीने सोडवण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान” राबविण्यात येणार असल्याची माहिती श्रीवर्धन प्रशासनाने पत्रकार परिषदेत दिली. या अभियानाद्वारे नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करणे, महसूल सेवा अधिक लोकाभिमुख व कार्यक्षम बनविणे आणि डिजिटल सेवांचा वापर वाढविणे हा मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. महसूल विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील प्रत्येक तालुक्यात मंडळ स्तरावर तसेच नगर परिषद व नगर पंचायत स्तरावर एकदिवसीय महसूल समाधान शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरांमध्ये नागरिकांना Single Day Service Delivery पद्धतीने विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पत्रकार परिषदेत देण्यात आलेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन तालुक्यात मार्च ते मे २०२६ या कालावधीत विविध ठिकाणी समाधान शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये बोर्लीपंचतन, वाळवटी व श्रीवर्धन मंडळ क्षेत्रात खालीलप्रमाणे शिबिरे घेण्यात येणार आहेत. शिबीराचे वेळापत्रक ०७ मार्च २०२६ बोर्लीपंचतन १४ मार्च २०२६ वाळवटी १० एप्रिल २०२६ बोर्लीपंचतन १७ एप्रिल २०२६ वाळवटी ०८ मे २०२६ श्रीवर्धन १५ मे २०२६ श्रीवर्धन या शिबिरांवर नियंत्रण अधिकारी म्हणून नायब तहसीलदार मनोज माने, नि. ना. तहसीलदार अनंत शेळके तसेच पुरवठा निरीक्षक रुपाली सुने आदी अधिकारी कार्यरत राहणार आहेत. संबंधित मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांच्यामार्फत शिबिरांचे नियोजन व अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या शिबिरांमध्ये नागरिकांना विविध महसूल सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये ७/१२ उतारे अद्ययावत करणे व वाटप, प्रलंबित फेरफार नोंदींचे निराकरण, भोगवटदार वर्ग २ जमीन वर्ग १ मध्ये रूपांतरणाची तपासणी, तुकडेबंदी कायद्याशी संबंधित नोंदींची पडताळणी, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे अर्ज व मंजुरी, विद्यार्थ्यांना आवश्यक दाखले वितरण तसेच ‘सर्वांसाठी घरे’ योजनेअंतर्गत पट्टे वाटप अशा विविध सेवांचा समावेश आहे.

टाईम्स स्पेशल

तसेच ‘जिवंत ७/१२ मोहिम’ अंतर्गत गावनिहाय ७/१२ वाचन करून प्रलंबित नोंदींची यादी तयार करण्यात येणार असून शिबिराच्या दिवशी अद्ययावत अभिलेख नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येतील. विद्यार्थ्यांसाठी आवश्यक दाखले शाळांमधून कॅम्प पद्धतीने अर्ज भरून शिबिराच्या दिवशी वितरित करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. श्रीवर्धन प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, जमीन, महसूल किंवा दाखल्यांशी संबंधित कोणतीही अडचण असल्यास संबंधित कागदपत्रांसह या समाधान शिबिरात उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा. तसेच या अभियानाची व्यापक प्रसिद्धी करून जास्तीत जास्त नागरिकांना मदत मिळेल यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न सुरू केल्याचेही सांगण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg