loader
Breaking News
Breaking News
Foto

मुख्यमंत्री माझी शाळा आडाळी जिल्हा परिषद तालुक्यात दुसरी

दोडामार्ग (प्रतिनिधी) -मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा 3 अभियानात आडाळी जिल्हा परिषद शाळा नं 1 ने तालुक्यात दुसरा नंबर पटकवला. या यशाबद्दल शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे. राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबविले जाते. यात शाळांच्या पायाभूत सुविधा, शासनाच्या शिक्षणाविषयक ध्येय धोरणंची होणारी परिणामकारक अंमलबजवाणी आणि मुलांची शैक्षणिक संपादणूक या मुद्द्यावर शाळेचे मूल्यमापन केले जाते. यावर्षीच्या तालुकास्तरीय मूल्यमापनात आडाळी शाळा नं 1 ला दुसरा क्रमांक प्राप्त झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावर्षी शाळेत तब्बल 28 वर्षानंतर पुन्हा पाचवीचा वर्ग सुरु करण्यात आला. तसेच मुख्याध्यापक सायली देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक शिक्षक रामदास पावरा, दर्शना केसरकर यांनी सरपंच पराग गांवकर यांच्या संकल्पनेतून सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी विशेष उपक्रम राबविले. ग्रामपंचायतच्या माध्यमातून तसेच सरपंच गांवकर यांनी स्वखर्चाने गेल्या तीन वर्षात शाळेच्या आवश्यक त्या भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. पालक, ग्रामस्थ वं माजी विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळे शाळेच्या सुशोभीकरण करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी लोकसहभागातून तब्बल एक लाखाहून अधिक निधी उभा केला. तर माजी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष अमोल परब यांच्या नेतृत्वाखाली रंगकामासाठी नव्वद हजार एवढ्या निधीचे संकलन करण्यात आले. त्यामुळे लहान शाळा असून देखील मिळालेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाबद्दल विद्यार्थी, पालकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg