loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात आरटीओची २१ स्कूल बस व ४ अवैध बसेसवर कारवाई

ठाणे (अमोल पवार) - मार्च महिन्यात ठाण्यात अवैध प्रवासी वाहतूक आणि निष्काळजी स्कूल बसचालकांविरोधात मोठी कारवाई उघड झाली आहे. १ ते ३१ मार्चदरम्यान स्कूल बस आणि अवैध खाजगी प्रवासी वाहतूक तपासणी मोहीम राबवण्यात आली. प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे यांनी तब्बल १०० स्कूल बसांची तपासणी केली असून त्यापैकी २१ बसवर दंडात्मक तसेच परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या ४ खाजगी बसेसवरही कारवाई करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड आणि परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक यावर प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट आदेश देत विशेष तपासणी मोहिमेत नियमभंग करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवू नये, असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे यांच्या पथकांनी शहर व ग्रामीण भागात व्यापक तपासणी सुरू केली आहे. वागळे इस्टेट, घोडबंदर रोड, कोपरी, कळवा, भिवंडी शहर-ग्रामीण तसेच शहापूर परिसरात अचानक तपासणी करून बसांची कागदपत्रे, फिटनेस, विमा, परवाने, आपत्कालीन बाहेर पडण्याचे दरवाजे, अग्निशामक यंत्रणा, सीसीटीव्ही आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सुविधा यांची पडताळणी करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

तपासणीत अनेक बसमध्ये तांत्रिक त्रुटी, अपूर्ण कागदपत्रे, फिटनेस प्रमाणपत्राचा अभाव, तसेच काही ठिकाणी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आढळले. अशा २१ स्कूल बसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. संबंधितांना दंड ठोठावण्याबरोबरच नियमांची तात्काळ पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याच दरम्यान परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या ४ खाजगी बसेसवर कारवाई करण्यात आली. विद्यार्थ्यांची सुरक्षितता, अधिकृत प्रवासी वाहतूक व्यवस्था आणि कायद्याची अंमलबजावणी यासाठी ही मोहीम महत्वाची आहे.. “नियम मोडणाऱ्यांना माफी नाही” असे कडक धोरण राबवणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg