loader
Breaking News
Breaking News
Foto

शासकीय कामात अडथळा आणणार्‍या दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल

दापोली (वार्ताहर) : गस्त घालणार्‍या सीमाशुल्क (कस्टम्स) विभागाच्या पथकातील कर्मचार्‍यांना शिवीगाळ करून त्यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणणार्‍या दोन संशयीताविरोधात दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना हर्णे जेटी येथे घडली. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमाशुल्क विभागाचे निरीक्षक निखील डिंगवाल हे त्यांचे सहकारी हेड हवालदार विलणकर व हवालदार करण मेहता यांचेसह सागरी मार्गावर गस्त घालत असताना त्यांना हर्णे जेटीच्या जवळ एक वाहन आढळून आले. त्यात दोन व्यक्ती बसलेल्या होत्या. पथकातील कर्मचार्‍यांनी त्यांचेकडे चौकशी केली असता त्यातील एकाने हवालदार करण मेहता यांचेकडे त्यांच्या ओळखपत्राची मागणी करून मेहता यांचा गणवेश ओढून त्यांना मारहाण करत शिवीगाळ केली. त्यानंतर ही घटना वरिष्ठ अधिकार्‍यांना कळविण्यात आल्यावर सीमाशुल्क विभागाचे अधीक्षक विकास जाखड हर्णे येथे पोचले. त्यानंतर हे दोन संशयित बसलेल्या वाहनाची तपासणी करण्यात आली. त्यांची नावे विचारली असता मयुरेश अशोक आम्बुर्ले रा. हर्णे बाजारपेठ व सुशांत वसंत चव्हाण सध्या रा. हर्णे अशी सांगण्यात आली. सीमाशुल्क विभागाचे निरीक्षक निखील डिंगवाल यांनी या दोन संशयित यांचेविरोधात दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg