loader
Breaking News
Breaking News
Foto

लांज्यातील देवधे बौद्धवाडी व मणचेकरवाडी परिसरात वणवा, लाखो रुपयांचे नुकसान

लांजा (संजय साळवी) - तालुक्यातील देवधे बौद्धवाडी व मणचेकरवाडी परिसरात शुक्रवारी ६ मार्च रोजी भर दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या वणव्यात सुमारे ३० एकरवरील दहा ते बारा बागायतदारांची आंबा व काजूची कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या वणव्याची माहिती मिळताच लांजाचे निवासी नायब तहसीलदार अनिल गोसावी यांनी लांजा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार तसेच राजापूर येथील अग्निशामक दलाशी संपर्क साधून तातडीने अग्निशामक बंब घटनास्थळी पाचारण केला. त्यानंतर अग्निशामक दलाच्या पथकाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करून हा वणवा अखेर आटोक्यात आणला. त्यामुळे परिसरातील आणखीन काही आंबा व काजू बागायतदारांचे होणारे नुकसान टळले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या घटनेची माहिती मिळताच पुनस मंडळ अधिकारी रोहीदास राठोड यांच्यासह अन्य महसूल कर्मचारी, देवधेचे सरपंच राजाराम हरमले, पोलीस पाटील संदीप कांबळे तसेच स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. हा वणवा आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेमुळे आंबा व काजू बागायतदारांनी संभाव्य मोठी हानी टळली असली तरी या घटनेमुळे लांजा तालुक्यात स्वतंत्र अग्निशमन बंबाची आवश्यकता असल्याचे पुन्हा एकदा प्रकर्षाने अधोरेखित झाले आहे. भविष्यात अशा आपत्कालीन परिस्थितींना तातडीने सामोरे जाण्यासाठी तालुकास्तरावर अग्निशमन यंत्रणा उपलब्ध असणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg