loader
Breaking News
Breaking News
Foto

कळंबस्ते मुचरी या प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या रस्त्याला 20 लाखची तरतूद

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - संगमेश्वर तालुक्यातील देवरुख विघ्रवली सोनवडे मुचरी कळंबस्ते रस्ता प्र. जि. मा. क्र. ४६ हा रस्ता सुमारे ३० ते ४० वर्ष अस्तित्वात आहे. परंतु रस्त्यावरील मुचरी गवळवाडी ते कळंबस्ते हा भाग सुमारे २.५० ते ३. की.मी. भाग दुर्लक्षित आहे. तसेच वाहतुकीस योग्य नाही. व प्र. जि. मा. असलेल्या रस्त्याची अवस्था हि दयनीय आहे. सदर रस्ता सुरक्षित असेल तर सध्या संगमेश्वर शास्त्रीपूल ते तुरळ हायवे वरील ये-जा करणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देवरुखवरून जाणारा वाहनधारक संगमेश्वर ते शास्त्रीपूल येथील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी सदर मार्गाचा वापर करून कसबा, फणसवणे, नायरी, शृंगारपुर, ताम्बेडी, चिखली, कडवई, तुरळ हायवेपर्यंत जाणाऱ्या वाहनधारकांची सोय होईल. तरी मुचरी गवळवाडी दत्तमंदिर ते कळंबस्ते या प्र. जि. मा. रस्त्याच्या भागाची तात्काळ दुरुस्ती करणेत यावी, अशी पंचक्रोशीतील ग्रामस्थ्यांची मांगणी होती. या संबंधी अनेकवेळा सोशल मीडिया आणि वृत्तपत्रातून आवाज उठवण्यात आला होता.

टाईम्स स्पेशल

वरील मागणीचा विचार करून चिपळूण संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांनी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्प अधि्वेषणात शासनाचे लक्ष वेधल्याने या रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली असुन त्यासाठी विस लाखाची मजुरी दिल्याचे जाहीर केल्याने संगमेरश्वरवासीय आणि वाहनचालकांनी समाधान व्यक्त करून आमदार निकम आणि राज्य शासनाचे आभार मानले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg