loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात ४१ लाखाच्या एमडी पावडरसह एक गजाआड

ठाणे (प्रतिनिधी) - ठाण्यात घोडबंदर रोडवरएमडी अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आलेल्या राज्यस्थान येथील 30 वर्षीय राजेशकुमार मगनाराम याला ठाणे गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून २०८.७ ग्रॅम वजनाचा एमडी जप्त करण्यात आला. त्या मुद्देमालाची किंमत ४१ लाख ७४ हजार रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ठाण्यातील घोडबंडर रोडवरील ओवळा नाका येथील सागर लॉजिंग अँड बोर्डिंग येथे ३ मार्च रोजी सकाळच्या सुमारास राजेशकुमार नामक तरुण एमडी पावडर विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ कर्णवर-पाटील आणि पोलिस उपनिरीक्षक दीपक डुम्मलवाड यांच्या पथकाने सापळा रचून राजेशकुमार याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत त्याच्याकडून २०८.७ ग्रॅम वजनाचा एमडी हा अमली पदार्थाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच त्याच्याकडे मोबाईल फोन आणि रोख दोन हजार १७० रुपये मिळून आले.

टाईम्स स्पेशल

बेकायदेशीर रित्या अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत, त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास अमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांमार्फत सुरू आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg