loader
Breaking News
Breaking News
Foto

पेट्रोल-डिझेलच्या किमती सध्यातरी कायम

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार, या चर्चेने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. मात्र, सध्या तरी देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतीवर या संघर्षाचा परिणाम होणार नाही. ‘देशातील तेल कंपन्यांकडे अजून काही महिने पुरेल इतका तेलसाठा आहे. त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपांसमोर रांगा लावू नयेत,’ असे आवाहन ‘ऑल इंडिया पेट्रोल असोसिएशन’ कडून करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

‘इराण-इस्रायलमध्ये पेटलेल्या युद्धामुळे पश्चिम आशियात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. इराण, इराक, सौदी अरेबिया, अबुधाबी, कुवेत, कतार या देशांमधून मोठ्या प्रमाणात तेलाची निर्यात केली जाते. हे देश तेलाचे दर ठरवणाऱ्या तेल उत्पादक संघटनेचे, ‘ओपेक’चे सदस्य आहेत. आखातात निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींवर पर्यायाने देशातील तेलाच्या पुरवठ्यावर होतो. सोमवारी, एका दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती सुमारे सात टक्क्यांनी वाढल्या. भारतावर होणारे परिणाम लगेच सांगता येणार नाहीत. त्यासाठी काही काळ वाट पहावी लागेल.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg