loader
Breaking News
Breaking News
Foto

डेरवण युथ गेम्समध्ये ऍक्वा टेक्निक्स स्विमिंग अकॅडमीचे उल्लेखनीय यश

रत्नागिरी (वार्ताहर) - डेरवण येथे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा डेरवण युथ गेम्स यांच्या वतीने महाराष्ट्र स्टेट अमेच्युअर अक्वाटिक असोसिएशनच्या मान्यतेने पार पडली. या स्पर्धेत राज्यभरातून २०० हून अधिक जलतरणपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रत्नागिरीतील नामांकित ऍक्वा टेक्निक्स स्विमिंग अकॅडमीकडून सुमारे २५ जलतरणपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला. विशेष म्हणजे रत्नागिरीमधून सर्वाधिक स्पर्धक याच अकॅडमीचे होते. उत्कृष्ट कामगिरी करत अकॅडमीने एकूण १३ पदके पटकावत रत्नागिरीतील सर्वोत्तम अकॅडमी हा मान मिळवला. या सर्व खेळाडूंना NIS प्रमाणित प्रशिक्षक विवेक विलणकर यांचे सातत्यपूर्ण व तांत्रिक मार्गदर्शन लाभले. त्यांच्या कुशल प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले. स्पर्धेतील निकालानुसार क्रिशांग पखाले याने २०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये कांस्यपदक तर १०० मीटर बटरफ्लाय, १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक आणि १०० मीटर फ्रीस्टाईल या प्रकारांमध्ये रौप्यपदके मिळवली. तसेच ४×५० मीटर फ्रीस्टाईल रिले स्पर्धेतही त्याने रौप्यपदक मिळवले. आज्ञा शिंदे हिने ४×५० मीटर मिक्स फ्रीस्टाईल रिले आणि ४×५० मीटर मिक्स मिडले रिले या दोन्ही स्पर्धांमध्ये रौप्यपदके मिळवली. जतीन भोसले याने ४×५० मीटर मिक्स फ्रीस्टाईल रिले स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. रुद्र सरफरे आणि हर्ष शेलार यांनी ४×५० मीटर मिक्स मिडले रिले स्पर्धेत रौप्यपदकांची कमाई केली. या स्पर्धेत ट्रिया तबिटा राकेश विलणकर (वय ४.५ वर्षे) हिने ५० मीटर फ्रीस्टाईल व ५० मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत सहभाग घेतला. अवघ्या साडेचार वर्षांच्या या चिमुकलीने आपल्या धाडसी सहभागाने आणि जिद्दीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या यशाबद्दल सर्व विजेत्या खेळाडूंचे, पालकांचे आणि प्रशिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन होत असून ऍक्वा टेक्निक्स स्विमिंग अकॅडमीने १३ पदके जिंकत रत्नागिरीतील सर्वोत्तम अकॅडमी म्हणून आपली ओळख पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg